सोलापूर : उजनी धरणातील पाण्याचा आदेश रद्द करण्यात आलाय. स्वतः राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय घेतलाय. उजनी धरणातील पाणी इंदापूरला वळवले जात असल्याचा आरोप होत होता. यावरुन इंदापुरचे आमदार तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात सोलापुरात अनेक आंदोलनंही झाली. सोलापुरातल्या लोकप्रतिनिधींनीही याला मोठा विरोध केला. त्यानंतर आज (18 मे) अखेर जयंत पाटील यांनी तो आदेश रद्द केला. यावेळी त्यांनी संबंधित आदेश केवळ सर्वेक्षणाचा होता. मात्र, त्याबाबत गैरसमज पसरवले जात असल्याने आदेश रद्द केल्याचं मत व्यक्त केलं (Jayant Patil order to canceled gr on Indapur Ujani dam water distribution).
जयंत पाटील म्हणाले, “सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय मामा शिंदे, यशवंत माने यांच्यासह शिष्टमंडळाने माझी भेट घेतली. सोलापूर जिल्ह्याच्या सध्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत त्यांनी भूमिका मांडली. सोलापूर जिल्ह्याच्या उजनीच्या जलाशयातून पाणी सोलापूर जिल्ह्याला वाटप केलेले आहे. त्यातल्या एकाही थेंबाला धक्का लागणार नाही. शासनाकडून 22 एप्रिलला एक सर्वेक्षणाचा आदेश निघाला होता. त्याबाबत बरेच गैरसमज झालेले आहेत. त्यामुळे मी ते आदेश रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत.”
“सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला असणाऱ्या पाण्याचा कोणताही संबंध येणार नाही अशा पद्धतीने निर्णय घेण्यात आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी कोणताही गैरसमज होऊ देऊ नये, अशी माझी विनंती आहे. सर्वांनी एकत्रितपणे विचार केलेला आहे,” असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं.
जयंत पाटील म्हणाले, “महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज वेगवेगळ्या विषयांवर बैठक आणि चर्चा झाली. चर्चेच्या प्रक्रियेप्रमाणे दोन-तीन आठवड्यांनी यबाबतीत चर्चा झाली. महामंडळ आणि जागावाटपाचे काम चालले आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख यांनी आज येथे बसून चर्चा केली.”
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
Jayant Patil order to canceled gr on Indapur Ujani dam water distribution