अकोला : व्यक्ती विकास संघटन जेसीआय ओळखले जाते. समाजात दुर्लक्षित असलेल्या तृतीयपंथींचा बहुमान वाढवावा, या उदात्ते हेतूने प्रेरित होऊन तृतीयपंथी यांचा फॅशन व टॅलेंट शोचे आयोजन करण्यात आले. या फॅशन शोकरिता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून एकूण 33 तृतीयपंथी सहभागी झाले. तृतीयपंथी यांनी आपल्या कलांचे सादरीकरण करून अकोटवासीयांना मंत्रमुग्ध केले.
अकोट शहरांमधील जेसीआय ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून जेसीआय सप्ताहामध्ये नवनवीन उपक्रम राबवत असते. यामध्ये त्यांनी या वर्षी तृतीयपंथीयांसाठी तृतीयपंथीयांचा रॅम्पवॉक ठेवला. या रॅम्पवॉकमध्ये जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण विदर्भातून या ठिकाणी तृतीयपंथी आले होते.
अकोला बुलढाणा, वाशीम, यवतमाळ या ठिकाणाहून तृतीयपंथी आले. त्यांनी या रॅम्पवॉकमध्ये आपली कला दाखवून सर्वांची मनं जिंकली. या फॅशन शोमध्ये सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
JCI अकोट हा दरवर्षी सप्ताह साजरा करत असतो. यावर्षी या सप्ताहामध्ये कला तृतीयपंथीयांची हा उपक्रम घेतला. यामध्ये फॅशन शोचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती अकोट जेसीआयचे अध्यक्ष अतुल भिरडे यांनी दिली. यावेळी तृतीतपंथी गुरु सिमरन, सानिका राजपूत, फॅशन शो पाहायला आलेली प्रेक्षक पल्लवी गणगणे व जेसीआय सप्ताह प्रमुख विकास चावडा प्रामुख्यानं उपस्थित होते.
फॅशन शो, टॅलेंट शो असे कार्यक्रम सामान्य लोकांचे होतात. तृतीयपंथ हेसुद्धा समाजाचे एक घटक आहेत. त्यांना फॅशन शोच्या माध्यमातून स्टेज उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळं ते खूश होते. आम्हाला स्टेज उपलब्ध झाल्यानं आम्ही त्याचा मनमुराद आनंद घेतल्याचा अनुभव ते सांगत होते. अशा कार्यक्रमांमुळे आम्हाला प्रेरणा मिळते. आम्हीसुद्धा सामान्य व्यक्तीसारखे जीवन जगू शकतो, असा आत्मविश्वास निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं.