Akola Crime | धक्कादायक ! पाेलीस कोठडीत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, सराफा व्यापाऱ्याचा पोलिसांवरच गंभीर आरोप
कोला जिल्ह्यात अक्षरशः अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. अकोला स्थानिक गुन्हे शाखेत एका सराफा व्यापाऱ्याने स्वत:वर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला. याबाबत पिडीत आरोपीने पोलिसात तक्रार दाखल केली.
अकोला : अकोला (Akola) जिल्ह्यात अक्षरशः अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. एका सराफा व्यापाऱ्याने पोलिसांनी त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला. अकोला स्थानिक गुन्हे शाखेत (Local Crime Branch) हा प्रकार घडल्याचे व्यापाऱ्या म्हटले आहे. याबाबत पिडीत आरोपीने पोलिसात तक्रार दाखल केलीय. या प्रकरणी सहायक पोलीस (Police) निरीक्षक तसेच पोलीस कर्मचाऱ्यास रात्री उशिरा पोलीस मुख्यालयात अटॅच करण्यात आलं. या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला जातोय.
पोलीस कोठडीत मारहाण, अनैसर्गिक अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार 9 जानेवारी रोजी अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण आणि शिपाई शक्ती कांबळे यांनी चोरीचे सोने खरेदी केल्याप्रकरणी शेगावमधील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकला रात्री 3 वाजता शेगावातून अटक केलं. यावेळी शेगावातून अकोल्यात आणताना सराफा व्यापाऱ्याला गाडीतच प्रचंड मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. या दोन दिवसांत आरोपी सराफा व्यापाऱ्याला एपीआय चव्हाण आणि शिपाई कांबळे याने मारहाण केली. तसेच पोलीस कोठडीत आरोपीवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. तसा आरोप पीडित सराफा व्यापाऱ्याने केला आहे.
अद्याप कोणतीही कारवाई नाही
दरम्यान, व्यापाऱ्याची जामिनावर सुटका झाली. पोलिसांच्या तावडीतून बाहेर आल्यानंतर हादरलेल्या व्यापाऱ्याने आपल्या कुटुंबीयांना ही आपबिती सांगितली. व्यापाऱ्याच्या जळालेल्या पायावर अकोल्यातील एका खासगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आरोपी व्यापाऱ्याने अकोला पोलीस अधिक्षक आणि सिटी कोतवाली पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणात पोलिसांनी सध्या कोणताही गुन्हा दाखल केलेला नसून शहर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे चौकशी सोपवण्यात आली आहे.
इतर बातम्या :
Beed Crime | बीडमध्ये भाजप नेत्याच्या शिपायाला लुटले, जीवे मारण्याची धमकी; चोरट्यांचा शोध सुरु