Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी वडील वारले, संध्याकाळी आईचं निधन, तासाभरात इंजिनिअर मुलाचाही मृत्यू, 13 तासात कुटुंब संपलं

शिराळा तालुक्यातील शिरशी (Shirshi Sangli) येथील झिमुर कुटुंबीयांवर कोरोनाने घाला घातला. अवघ्या 13 तासात सगळं कुटुंब कोरोनाने हिरावलं.

सकाळी वडील वारले, संध्याकाळी आईचं निधन, तासाभरात इंजिनिअर मुलाचाही मृत्यू, 13 तासात कुटुंब संपलं
13 तासात संपूर्ण कुटुंब कोरोनाने हिरावलं
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 3:49 PM

सांगली : कोरोनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली (corona death) असताना, इकडे सांगली हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अवघ्या 13 तासात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. सांगली (Sangli corona) जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील शिरशी (Shirshi Sangli) येथील झिमुर कुटुंबीयांवर कोरोनाने घाला घातला. अवघ्या 13 तासात सगळं कुटुंब कोरोनाने हिरावलं. (Jhimur family Father, mother and Engineer son died due to corona within 13 hours in Shirshi Shirala Sangli Maharashtra)

पहाटे 5 वाजता वडील, तर संध्याकाळी 5 वाजता आई आणि त्यानंतर सहा वाजता मुलगा असे 13 तासात कुटुंब उध्वस्त झाले आहे. तर आठ दिवसांपूर्वी चुलत भावाचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे आठ दिवसात झिमुर कुटुंबातील चार जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आई, वडील, मुलगा आणि पुतण्या असा चौघांचा मृत्यू झाल्याने शिरशी गावासह पंचक्रोशी सैरभैर झाली आहे.

झिमुर गाव शोकसागरात

शिराळा हा डोंगरी आणि दुर्गम तालुका. हा तालुकाअति पावसाचा तालुका म्हणूनही ओळखला जातो .या तालुक्यातील बहुतांशी लोक हे नोकरीनिमित्त मुंबईला असतात. शिराळा उत्तर भागातल्या शिरशी गावातील झिमुर कुटुंब हे उदरनिर्वाहासाठी मुंबईला होते. ज्यांचा मृत्यू झाला ते वडील मिल कामगार होते. सेवानिवृत्त झाल्याने आपल्या पत्नीसह 15 वर्षा पूर्वी गावी आले होते. इथे येऊन ते शेती करू लागले. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. मुली विवाहित आहेत. मुलगा मुंबईत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. त्याचे एक वर्षा पूर्वी लग्न झाले. त्याची पत्नीही पदवीधर आहे.

आई आजारी असल्याने मुलगा गावी

इंजिनिअर असणारा मुलगा पंधरा दिवसांपूर्वी गावी आला. त्यावेळी आई आजारी असल्याने गावीच थांबला. आईला कोरोनाचा संसर्ग झाला. तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान त्याच्या वडिलांनाही कोरोणाची लागण झाली. त्या दोघांवर उपचार सुरू झाले. आई वडिलांची प्रकृती सुधारली होती. मात्र पुन्हा वडिलांची तब्बेत बिघडली. दरम्यान इंजिनिअर मुलालाही कोरोनाने गाठलं.

पहाटे वडिलांचं, संध्याकाळी आईचं निधन 

एकामागोमाग एक असे तिघे कोरोनाबाधित झाले. उपचार सुरु असताना तरुणाच्या वडिलांचे निधन झालं. त्यावेळी आई आणि मुलगा व्हेंटिलेटरवर होते. सोमवारी सकाळी पाच वाजता पहाटे वडिलांचे निधन झाले. सकाळी झिमुर कुटुंबीयांनी त्यांचे अंत्यसंस्कार आटोपले. तोपर्यंत आई आणि मुलगा व्हेंटिलेटरवर होते.

सायंकाळी पाच वाजता आईचे निधन झाले. हा झिमुर कुटुंबीयांवर 12 तासात दुसरा आघात होता. ते दुःख समोर उभे असतानाच आईच्या निधनानंतर अवघ्या एका तासात मुलाचाही मृत्यू झाला. हा आघात मात्र झिमुर कुटुंबीयांना न पचणारा होता. नेमकं काय घडतंय हे अजूनही कुणाला समजत नाही.

झिमुर कुटुंब दुःखात बुडाले आहे. एकाच दिवशी इतके आघात झाल्याने शिरशी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. आठ दिवसांपूर्वी याच मुलाच्या चुलत भावाचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यामुळे आठ दिवसात झिमुर कुटुंबातील चार जणांचा कोरोनाने बळी घेतला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. अख्खी पंचक्रोशी सैरभैर झाली आहे.

संबंधित बातम्या 

लसीसाठी तरतूद केलेले 35 हजार कोटी गेले कुठे? राज्यांवर लसींचा बोजा का?    

Covid 19 Home Test Kit Demo : 250 रुपयाच्या किटने घरीच कोरोना टेस्ट कशी करायची? स्टेप बाय स्टेप माहिती 

(Jhimur family Father, mother and Engineer son died due to corona within 13 hours in Shirshi Shirala Sangli Maharashtra)

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.