जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही लढाचं, हजारो आव्हाड तुमच्यासोबत आहेत, अमोल मिटकरी यांचा सल्ला काय?
काही काळापूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्या जीवावर उठले होते. प्रचंड मानसिक त्रास दिला गेला.
अकोला : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळं व्यथित होऊन जितेंद्र आव्हाड यांनी आमदराकीचा राजीनामा दिला. यावर बोलताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले, भय, भ्रम, चरित्र आणि हत्या ही मुनवाद्यांची चार हत्यारं आहेत, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं. जितेंद्र आव्हाड हे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, महात्मा गांधी यांच्या विचाराचे पाईक आहेत. काही लोकं हे देशात दहशत निर्माण करतात. विरोधकांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर बोलतात. ज्या दोन महिलांबद्दल पंडित नेहरू यांचा फोटो दाखविला जातो. ती त्यांची सख्खी बहीण विजयालक्ष्मी पंडित आणि त्यांची भाजी यांचा तो फोटो आहे. तरीही पंडित नेहरू यांच्या चारित्र्यावर शिंतोडे ओढविले जातात. हजारो वर्षांची त्यांची परंपरा आहे.
मनुवाद्यांनी शस्त्र परत दिली आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल सुरुवातीला भीती दाखविण्यात आली. एखादा व्यक्ती शिवाजी महाराज यांचा इतिहास विकृत होत असेल. त्याबद्दल बोलत असेल. त्याबद्दल खोटा गुन्हा दाखल केला जातो. केतकी चितळे यांच्या वकिलांनी सांगितलं की, आव्हाडांवर 354 दाखल करा. त्यानंतर पुलाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं भाजपच्या पदाधिकारी पुढं येतात.
माझ्यासोबत असभ्य वर्तन केल्याचं सांगतात. पोलीस तात्काळ 354 दाखल करतात. याचा अर्थ जनतेला कळते. जनता ही दूधखुळी नाही. आव्हाड यांना माझी विनंती आहे. राजीनामा देण्याची काही गरज नाही. कोण कसा आहे, हे जनतेला माहीत आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले.
सध्या राज्यात विभत्स आणि वाईट सुरू आहे. पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्यांना कसे धोके होऊ शकतात. भय, चरीत्र, भ्रम आणि हत्या ही मनुवादी विचारसरणी असल्याचं बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं.
काही काळापूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्या जीवावर उठले होते. प्रचंड मानसिक त्रास दिला गेला. एखाद्या व्यक्तीला खालच्या पातळीवर जाऊन त्रास देणार असाल तर सहाजिक आहे. पण, आव्हाड साहेब तुम्ही लढणारे योद्धे आहात. तुमच्यासारखे हजारो आव्हाड आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा सल्ला अमोल मिटकरी यांनी दिला.