Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सर्रासपणे गुन्हे दाखल, तरुणांना नोकरी आणि पासपोर्ट मिळेनात; प्रणिती शिंदे मुख्यमंत्र्यांना भेटणार

केवळ सोलापूर शहरात कोरोना काळात सोलापूर शहर पोलिसांनी 5 हजार 30 गुन्हे दाखल केलेत. ज्या माध्यामातून 11 हजार पेक्षा जास्त लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. केवळ गुन्हेच नाहीच तर मास्क न वापरलेल्या लोकांना 1 कोटी 96 लाखांचा दंड देखील सोलापूर पोलिसांनी केला आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सर्रासपणे गुन्हे दाखल, तरुणांना नोकरी आणि पासपोर्ट मिळेनात; प्रणिती शिंदे मुख्यमंत्र्यांना भेटणार
आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सर्रासपणे गुन्हे दाखल
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 6:25 PM

सोलापूर : संपूर्ण राज्यभरात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत पोलिसांनी कारवाई केलीय. सरकारच्या निर्देशानुसार नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींकडून कोट्यावधींचा दंडच वसूल केला नाही तर हजारो लोकांवर पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केले आहेत. विशेष म्हणजे भांदवि कलम १८८ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे आता सर्वसामान्यांना पासपोर्टसाठी फटका बसतोय. (Job problems for youth due to filing of offenses under Disaster Management Act)

गुन्हे दाखल करण्यात आलेल्या तरुणांना नोकरीत अडचणी

सोलापुरातील एका नामांकित महाविद्यालयातून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या राकेश कुरापट्टी या तरुणाला पुण्यातील आयटी सेक्टरशी संबंधित असणाऱ्या मोठ्या कंपनीतून नोकरीची ऑफर आली आहे. घरात अठराविश्व दारिद्र्य असताना त्यातही शिक्षण पूर्ण केलेल्या राकेशला नोकरीची ऑफर निश्चितच आनंद देणारी आहे. मात्र कोरोना काळात दूध आणण्यासाठी केलेल्या राकेशवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे नोकरी मिळवण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

राकेश हा सोलापुरातील घोंगडे वस्ती परिसरात आपल्या अपंग आजीसोबत राहतो. गतवर्षी आजोबांना निमोनिया झालेला, आजीला चालता येत नाही म्हणून राकेश चहासाठी दूध आणायला घराबाहेर पडला. दूध घेऊन घराकडे परतत असताना पोलिसांनी राकेशवर कारवाई केली. त्यावेळी राकेशने लाख विनवण्या केल्या मात्र पोलिसांनी काही ऐकलं नाही. कलम 188 अंतर्गत राकेशवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आता नोकरीसाठी त्याला अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही व्यथा एकट्या राकेशची नसून कमी-अधिक प्रमाणात संपूर्ण राज्यात असे अनेक युवक अडचणीत आले आहेत.

केवळ सोलापूर शहरात 5,030 गुन्हे दाखल

केवळ सोलापूर शहरात कोरोना काळात सोलापूर शहर पोलिसांनी 5 हजार 30 गुन्हे दाखल केलेत. ज्या माध्यामातून 11 हजार पेक्षा जास्त लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. केवळ गुन्हेच नाहीच तर मास्क न वापरलेल्या लोकांना 1 कोटी 96 लाखांचा दंड देखील सोलापूर पोलिसांनी केला आहे. शैक्षणिक दाखले, पासपोर्ट, नोकरीच्या ठिकाणी अनेकांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची गरज असते. मात्र कलम 188 नुसार गुन्हे दाखल असल्याने चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र काढताना अडचणी येतात. आज प्रणिती शिंदे यांनी राकेशच्या घरी भेट देऊन यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन राज्यातील युवकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती करणार असल्याचे सांगितलं आहे.

गुन्ह्यांमुळे तरुणांचे भविष्य टांगणीला

राजकीय किंवा सामाजिक आंदोलने करत असताना दाखल झालेले किरकोळ गुन्हे राज्यशासनाच्या आदेशानुसार काही वर्षांनी रद्द केले जातात. त्याच पद्धतीने हे देखील गुन्हे माघारी घेण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. त्यामुळे कोरोना नियमांचा भंग केल्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे तरुणांचे भविष्यचं टांगणीला लागलंय, याबाबत सरकारने सकारात्मक विचार करावा अशी मागणी होत आहे. (Job problems for youth due to filing of offenses under Disaster Management Act)

इतर बातम्या

विमान प्रवाशांसाठी अलर्ट ! आता विमानात बसून बुक करता येणार टॅक्सी, या विमान कंपनीने सुरू केली ही सेवा

आधी दमदार फलंदाजी, मग भेदक गोलंदाजी, इंग्लंडमध्ये ‘या’ खेळाडूने 5 चेंडूत घेतले 4 विकेट

आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.