कॉलेजच्या दुसऱ्या माळ्यावरून मारली उडी, विद्यार्थिनीने का केला आत्महत्येचा प्रयत्न?

गंभीर जखमी विद्यार्थिनीला नागपूरच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. मात्र मुलीची प्रकृती गंभीर आहे.

कॉलेजच्या दुसऱ्या माळ्यावरून मारली उडी, विद्यार्थिनीने का केला आत्महत्येचा प्रयत्न?
कॉलेजच्या दुसऱ्या माळ्यावरून मारली उडीImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 7:48 PM

चंद्रपूर : कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेऊन विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहरातील सोमय्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये घडला. बारावीचे शिक्षण घेणारी ही विद्यार्थिनी निट परीक्षेची तयारी करीत होती. प्रकरण दडपणाऱ्या संस्थेविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसैनिकांनी महाविद्यालयातील प्राचार्यांना मारहाण केली.

शहरातील नामवंत शिक्षण संस्था असलेल्या सोमय्या कॉलेजच्या इमारतीवरून विद्यार्थिनीने उडी घेतली. आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.

शनिवारी सोमय्या कॉलेज व पॉलिटेक्निक येथील बारावीत शिकणारी विद्यार्थिनी निट परीक्षेची तयारी करीत होती. तिने महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली.

जखमी अवस्थेत असलेल्या विद्यार्थिनीला शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूर उपचारासाठी नेण्यात आले.

नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना झाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. घटनेची माहिती शिवसैनिकांना मिळताच शिवसैनिक सोमय्या कॉलेजात दाखल झालेत.

घटनेला प्राचार्यांना जबाबदार ठरवून शिवसैनिकांनी मारहाण केली.याबाबत सोमय्या कॉलेजतील प्राचार्यांशी संपर्क साधला. परंतु, प्राचार्यांशी संपर्क होऊ शकला नाही. प्रकरण बाहेर निघणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जात आहे.

काल दुपारी पॉलिटेक्निक कॉलेजच्या बिल्डिंगमध्ये क्लास सुरु होते. यादरम्यान आर्याने उडी मारली. कॉलेजकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळं शिवसैनिकांनी प्राचार्याला मारहाण केली. मारहाण झाल्यावर एका शिक्षिकेने या घटनेची कबुली दिली.

गंभीर जखमी विद्यार्थिनीला नागपूरच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. मात्र मुलीची प्रकृती गंभीर आहे. अजून मुलीचे बयान नोंदविता आले नाही. यामुळं अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.