किरीट सोमय्यांचं नवं टार्गेट, विलासराव देशमुखांच्या परिवाराच्या साखर कारखान्यांच्या व्यवहारांची चौकशीची मागणी करणार
लातूरमध्ये किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर यावेळी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. विलासराव देशमुख आणि त्यांच्या परिवारानं ज्या ज्या साखर कारखान्यांचा व्यवहा केला आहे त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याच किरीट सोमय्या म्हणाले.
लातूर: भाजप नेते किरीट सोमय्या सध्या लातूर दौऱ्यावर आहेत. लातूरमध्येही किरीट सोमय्यांनी साखर कारखान्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन अजित पवारांवर आरोप केले. मात्र, लातूरमध्ये किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर यावेळी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. विलासराव देशमुख आणि त्यांच्या परिवारानं ज्या ज्या साखर कारखान्यांचा व्यवहा केला आहे त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याच किरीट सोमय्या म्हणाले. सोमय्यांनी यानिमित्तानं शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ काँग्रेस नेत्यांकडं मोर्चा वळवला आहे.
सोमय्यांच्या टार्गेटवर देशमुख परिवार
लातूर मधील साखर करखान्याच्याव्यवहाराची चौकशी करून डिसेंबर अखेर भ्रष्टाचार समोर आणणार आहे. विलासराव देशमुख आणि त्यांचा परिवार यांनी देखील ज्या साखर कारखान्याचे व्यवहार केले आहेत त्याची मी चौकशी करण्याची मागणी करणार आहे. माफिया पद्धतीने लातूर जिल्हा बँक काँग्रेसने ताब्यात घेतली, असल्याचा आरोप सोमय्यांनी केला.
अजित पवारांवरही निशाणा
अजित पवार यांनी जरंडेश्वर व्यतिरिक्त जे घोटाळे केले त्याची चौकशी झाले पाहिजे. शरद पवारांनी सारवा सारव केली..हे दोघे बनवा बनवी करित आहेत, अजित पवारांच्या बहिणींच्या नावे संपत्ती आहेत, असं सोमय्या म्हणाले.
संजय राऊतांइतकं कौतुक बायकोनंही केलं नाही
संजय राऊत ज्या पत्राचा उहापोह करीत आहेत–त्या संबंधीची कागदपत्रे समोर आणतो आहे. त्या पत्राच उत्तर देतो आहे, त्या 64 पानात 17 परिशिष्ट आहेत. त्या पत्रात काहीच माहिती नाही. 4 परिशिष्ट हे कराराच्या प्रति आहेत. संजय राऊत यांनी माझं जेव्हढ पत्रात कौतुक केले तेव्हडे माझ्या बायकोने बायकोने देखील कधी केले नाही.
नवाब मालिकाच जे सुरू आहे ते चुकीचं आहे. खूप घाई सुरू आहे. क्रांती रेडकर ने हिंदू पद्धतीने लग्न केल्याचा फोटो टाकल्या नंतर नवाब मलिक चिडले असावेत. कोणाचं खासगी आयुष्य असं समोर आणण्याचा अधिकार मालिकांना आहे का? हिंदुत्वाचा अपमान सहन करणार नाही. समीर वानखेडेची चूक असेल तर ती समोर येईलच. ही केस सुरू आहे मात्र कोणाचं खासगी आयुष्य असं समोर आणू नका, असं सोमय्या म्हणाले.
मी फक्त घोटाळे भ्रष्टाचार याबद्दलच बोलणार आहे, शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर आयटीच्या छाप्या वरून जे सुरू आहे,त्याच्यावरून लक्ष हटवण्यासाठी नवाब मालिकांच काम सुरू आहे, नवाब मलिक यांच्याकडे जे खात आहे,त्याबाबत त्यांनी बोलावं. क्रूझ पार्टी प्रकरण कोर्टात सुरू आहे त्यात जे समोर येईल ते येईल. ईडी आणि आयटीच्या चौकश्या वरून लक्ष हटवण्यासाठी नवाब मलिक बोलत आहेत. कोविड मध्ये मुंबई महापालिकेने मृत्यू लपवले हा भ्रष्टाचार काढला होता. कोविड सेंटरच्या जेवणातही भ्रष्टाचार झाला. आता पर्यंत मी केलेले आरोप कधीच खोटे ठरलेले नाहीत, असं किरीट सोमय्या म्हणाले. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र हे माझं लक्ष असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.
इतर बातम्या:
नवाब मलिकांनी जो निकाहनामा ट्विट केलाय तो खरा आहे, मौलानांनी खरं खरं सांगितलं, सहीसुद्धा दाखवली !
‘निकाहावेळी समीर दाऊद वानखेडे असंच नाव सांगितलं गेलं’, मौलाना मुजम्मिल अहमद यांचा खळबळजनक दावा
Kirit Somaiya said he will demanded probe in Vilasrao Deshmukh and his family sugar mill transactions corruption