Chandrapur Crime: चंद्रपूरमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीसह मुलीला चाकूने भोसकले; आरोपी पतीला पोलिसांकडून अटक

संशयातून वीरेंद्रने पत्नी सुमतीच्या पोटात व छातीत पाच धारदार चाकूने पाच वार केले. तर मुलगी सिमरनच्या पोटात एक घाव केला. या हल्ल्यात दोघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या. दोघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वेकोली माजरीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान सुमनचा मृत्यू झाला.

Chandrapur Crime: चंद्रपूरमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीसह मुलीला चाकूने भोसकले; आरोपी पतीला पोलिसांकडून अटक
चंद्रपूरमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीसह मुलीला चाकूने भोसकले
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 5:52 PM

चंद्रपूर : चारित्र्याच्या संशयावरुन व्यसनी पतीने पत्नी आणि मुलीला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना माजरी-भद्रावती तालुक्यातील माजरी पोलीस ठाण्याअंतर्गत कुचना येथे घडली आहे. या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी मुलीवर चंद्रपूरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वीरेंद्र रामप्यारे साहनी (43) असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून चाकू हल्ला

वेकोलीच्या ए-टाइप वसाहत कुचना कॉलोनी येथील ब्लॉक नंबर-10 क्वार्टर नंबर-77 मध्ये आरोपी वीरेंद्र साहनी हा पत्नी सुमन वीरेंद्र साहनी (36) आणि मुलगी सिमरन वीरेंद्र साहनी (17) यांच्यासोबत राहतो. वेकोली माजरीच्या खुल्या कोळसा खाणीत सुरक्षा रक्षक या पदावर कार्यरत असून त्याला गांजाचे व्यसन आहे. तसेच वीरेंद्र आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून त्याने हे हत्याकांड घडवून आणले.

संशयातून वीरेंद्रने पत्नी सुमतीच्या पोटात व छातीत पाच धारदार चाकूने पाच वार केले. तर मुलगी सिमरनच्या पोटात एक घाव केला. या हल्ल्यात दोघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या. दोघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वेकोली माजरीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान सुमनचा मृत्यू झाला. तर मुलगी सिमरनवर चंद्रपूर येथील कुबेर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हल्ल्यानंतर पळून जात असताना आरोपीला पाठलाग करुन पकडले

घटनेची माहिती मिळताच माजरी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यापाठोपाठ उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हेही घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्यानंतर वीरेंद्र तिथून पळून गेला. मात्र वसाहतीची भिंत ओलांडून विसलोन गावच्या रेल्वे मार्गाने पसार होत असतानाच माजरी पोलिसांनी कुचना कॉलनीतील काही युवकांच्या मदतीने त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनात माजरीचे ठाणेदार विनीत घागे व पथक करीत आहे. (Knife attack on wife and daughter in Chandrapur on suspicion of character)

इतर बातम्या

Video | पोलीस चोरामागे धावला, लोकांना वाटलं पिक्चरचं शूटिंग आहे! पण तसं नव्हतं, पाहा थरारक घटना

Nagpur Crime | प्रेयसीसाठी चोर बनलेला पोलिसांना धक्का मारून पळाला; जंगलात कसे केले सर्च ऑपरेशन?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.