कोल्हापूरकरांना मोठा दिलासा, तब्बल दोन महिन्यानंतर सर्वात कमी कोरोना रुग्ण संख्येची नोंद, मृत्यू संख्याही घटली!
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याला मोठा दिलासा मिळालेला आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर सर्वात कमी कोरोना रुग्ण संख्येची नोंद झाली आहे तर मृत्यूची संख्या देखील घटली आहे.
कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्याला मोठा दिलासा मिळालेला आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर सर्वात कमी कोरोना रुग्ण संख्येची नोंद झाली आहे तर मृत्यूची संख्या देखील घटली आहे. शासन आणि प्रशासनाच्या कठोर परिश्रमानंतर आणि मेहनतीनंतर कोरोनाला थोड्या प्रमाणात का होईना लगाम घालण्यात कोल्हापूरकरांना यश आलंय.
दोन महिन्यात सर्वांत कमी रुग्णसंख्येची नोंद, मृत्यूसंख्याही घटली
गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात 938 नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत तर 18 जणांचा मृत्यू झालाय. गेल्या दोन महिन्यात ही सर्वांत कमी रुग्णवाढ आहे तर मृत्यूची संख्या देखील घटत चालली आहे. दुसरीकडे समाधानाची बाब म्हणजे गगनबावडा तालुका कोरोना मुक्त झालाय. रुग्ण वाढ आणि मृत्यू कमी होत असल्याने प्रशासनाला दिलासा मिळालेला आहे.
टेस्टिंग, ट्रेसिंग, लसीकरण… कोरोनाला हरविण्याचा मंत्र
दररोज अधिक प्रमाणात होणाऱ्या टेस्टिंगमुळे संसर्गाचे प्रमाण कमी होत चाललेलं आहे तसेच जास्त टेस्टिंग झाल्याने लक्षण नसलेले लोकसुद्धा (असिम्टमॅटिक पेशंट) मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे देखील संसर्ग रोखला गेला. शिवाय टेस्टिंगमुळे सौम्य लक्षण असणाऱ्यांना सुद्धा वेळेत उपचार मिळाले. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण देखील घटलेलं पहायला मिळत आहे. दुसरीकडे लसीकरण देखील जोरात सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. लसीचा पुरवठा कमी झाला तरच लसीकरणात व्यत्यय येतोय नाहीतर एरव्ही लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नुकताच केंद्रिय पथकाचा दौरा
केंद्राच्या पथकाने 15 जुलैला कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा केला. पथकाने जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढाव घेतला. चार सदस्यीय पथकाने प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्याचबरोबर काही खाजगी हॉस्पिटल, लसीकरण केंद्रांना देखील भेटी दिल्या. रोजचे टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ऑक्सिजन पुरवठा, आयसीयू बेडची स्थिती, व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता, तिसर्या लाटेसाठी केलेली तयारी याची सविस्तर माहिती प्रशासनाने या पथकाला दिली.
आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा कोल्हापूर दौरा
कोल्हापूरची कोरोना स्थिती आटोक्यात येत नसल्याचे पाहून अनेक जण चिंता व्यक्त करत होते. प्रत्यक्ष आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा करून आरोग्य यंत्रणे करत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच काही त्रुटी दूर करून आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शन केलं.
(Kolhapur corona positive patient Decrease Due To testing Tressing And Vaccination)
हे ही वाचा :