Video : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर, पंचगंगेच्या पाणीपातळीत रात्रीत 7 फुटांची वाढ, राजाराम बंधारा पाण्याखाली!
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झालीय .ती जवळपास 20 फुटांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. (kolhapur District heavy Rain Panchganga water level rises by 7 feet at night)
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झालीय .ती जवळपास 20 फुटांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. (kolhapur District heavy Rain Panchganga water level rises by 7 feet at night)
राजाराम बंधारा पाण्याखाली, धरण क्षेत्रात संततधार
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत एका रात्रीत तब्बल सात फुटांची वाढ झालेली पाहायला मिळते. तसेच कसबा बावड्यातील राजाराम बंधारा देखील पाण्याखाली गेलेला आहे. जिल्ह्यात धरण क्षेत्रात पावसाची संततधार पाहायला मिळते.
शहरासह ग्रामीण भागालाही पावसाने झोडपलं
कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागालाही पावसाने झोडपून काढले. शेत कामाला वेग आला असताना पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची जराशी तारांबळ उडाली. पण पावसाच्या आगमनाने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
(kolhapur District heavy Rain Panchganga water level rises by 7 feet at night)
हे ही वाचा :
Video : रत्नागिरीत कोसळधार, गुहागरमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांना पूर, चिपळूण शहरात पूरसदृश्य परिस्थिती