डोळ्यादेखत 220 पाळीव डुकरे, 200 किलो काजू चोरटे सगळचं केलं लंपास; कुटुंबीयांकडे हताशपणे पाहण्याशिवाय पर्यायच नव्हता..

गुरव कुटुंबीयांतील सदस्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे गुरव कुटुंबीयांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर शेजाऱ्यांचे गुरव यांच्या घराकडे लक्ष गेल्यानंतर त्यांनी त्यांची सोडवणूक केली.

डोळ्यादेखत 220 पाळीव डुकरे, 200 किलो काजू चोरटे सगळचं केलं लंपास;  कुटुंबीयांकडे हताशपणे पाहण्याशिवाय पर्यायच नव्हता..
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 5:34 PM

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यामध्ये खानापूर पैकी रायवाडा येथे एकाच कुटुंबातील तिघांना दोरीने बांधून घालून अज्ञात 25 जणांच्या टोळीने दरोडा घातला आहे. यामध्ये चोरट्यांच्या टोळीने चक्क 220 डुकरे आणि रोकड पळवली आहेत. ही घटना रात्री तीनच्या सुमारास चिरका नावाच्या शेतात घडली आहे. चोरट्याने रात्री दहशत माजवत दरवाजे तोडले. प्रल्हाद राजाराम गुरव, पूनम प्रल्हाद गुरव व राजेश प्रल्हाद गुरव या तिघांना मारहाण करीत बांधून घातले. तोंडाला बांधल्यामुळे त्यांना आरडाओरडाही करता आला नाही. यावेळी साईडच्या राहणाऱ्या कोरवी यांनी त्यांना सोडविले.

यावेळी चोरट्यांनी 220 पाळीव डुकरे, 200 किलो काजूगर, सोने चांदी व दोन मोबाईल यासह अन्य घरगुती अंदाजे 9 लाख 17 हजाराचा ऐवज लंपास केला आहे.

चोरट्यानी केलेल्या मारहाणीत प्रल्हाद गुरव, पूनम गुरव व राजेश गुरव जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे हे श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र श्वान घराभोवतीच घुटमळले. या चोरट्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात मोठी जबरी चोरी झाल्यामुळे आजऱ्यासह चंदगड, भुदरगड आणि गडहिंग्लज तालुक्यातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आजरा तालुक्यातील खानापूर पैकी रायवाडा येथे एकाच कुटुंबातील तिघांना दोरीने बांधून घालून ही चोरी आणि मारहाण करण्यात आली आहे.  या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असून पोलिसांची तपास पथकं रवाना झाली आहेत.

गुरव कुटुंबीयांतील सदस्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे गुरव कुटुंबीयांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर शेजाऱ्यांचे गुरव यांच्या घराकडे लक्ष गेल्यानंतर त्यांनी त्यांची सोडवणूक केली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.