राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात कुस्तीला पाठबळ, मॅटवरील स्पर्धांचं आयोजन, समरजितसिंह घाटगेंची माहिती
गेल्या वर्षी कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यापासून देशात आणि राज्यात विविध निर्बंध लादण्यात आले होते. या निर्बंधातून कुस्ती देखील सुटू शकली नाही. महाराष्ट्र केसरी स्पर्धा, विविध ठिकाणी होणाऱ्या कुस्त्यांच्या जंगी स्पर्धा यावर देखील बंधनं आली.
कोल्हापूर: गेल्या वर्षी कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यापासून देशात आणि राज्यात विविध निर्बंध लादण्यात आले होते. या निर्बंधातून कुस्ती देखील सुटू शकली नाही. महाराष्ट्र केसरी स्पर्धा, विविध ठिकाणी होणाऱ्या कुस्त्यांच्या जंगी स्पर्धा यावर देखील बंधनं आली. कोरोनाच्या निर्बंधातून सूट देत इतर गोष्टी सुरु झाल्या. मात्र, अद्याप कुस्तीला कोरोना विषाणू संसर्गाच्या पूर्वीचे दिवस आलेले पाहायला मिळाले नाहीत. कोल्हापूर आणि कुस्तीचं नातं ऐतिहासिक आणि सर्वश्रूत आहे. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये कुस्तीला राजाश्रय दिल्याचं आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच कोल्हापूर जिल्ह्यातून कुस्तीच्या स्पर्धांची घोषणा करण्यात आली आहे.
राजर्षी शाहू महाराज यांचं मूळ घराणं असणाऱ्या घाटगे घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषद घेत कोल्हापूरमध्ये कुस्ती स्पर्धा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. कुस्ती पंढरी असलेल्या कोल्हापुरात दोन वर्षानंतर शड्डूचा आवाज घुमणार आहे. समरजितसिंह घाटगे यांनी कोरोना विषाणू संसर्गराच्या काळात संकटात सापडलेल्या कुस्तीपट्टू किंवा मल्ल यांना बळ मिळावं म्हणून हा निर्णय जाहीर केला आहे.
स्पर्धा कशा होणार?
कोल्हापुरातील शाहू सहकारी साखर कारखान्याच्या वतीने 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान मॅटवरील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोरोना निर्बंधांमुळे कुस्ती स्पर्धा बंद आहेत. त्यामुळे या स्पर्धा इनडोअर घेण्यात आल्या आहेत.
कुस्ती मॅटवर होणार
कागल तालुका आणि कारखाना कार्यक्षेत्रातील मल्लासाठी 31 विविध गटाची स्पर्धा होणार असल्यास देखील समरजितसिंह घाटगे यांनी म्हटलंय. कोरोनामुळे कुस्ती बंद असल्याने मल्ल आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना बळ मिळावे या हेतूने ही स्पर्धा भरवण्यात आली आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदा अशा प्रकारे स्पर्धा होत आहेत.
इतर साखर कारखान्यांनी स्पर्धा भरवाव्यात
शाहू सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं कुस्तीपट्टूंना बळ देण्यासाठी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील इतर सहकारी साख कारखान्यांनी देखील कुस्तीपट्टूंच्या पाठिशी उभ राहत स्पर्धांचं आयोजन करावं अशी भूमिका कुस्तीपट्टूंनी घेतली आहे. समरजितसिंह घाटगे यांनी घेतलेल्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं आहे.
कोल्हापूर आणि कुस्तीचं ऐतिहासिक नातं
कोल्हापूर आणि कुस्तीचं नातं हे ऐतिहासिक असल्याचं आपणा सर्वांना माहिती आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राजर्षी शाहू महाराजांनी कुस्तीला पाठबळ दिलं. कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या प्रोत्साहनामुळं अनेक कुस्तीपट्टू घडले. कोल्हापूर शहरातील खासबाग मैदान राजर्षी शाहू महाराजांच्या काळात तयार झालं. कोल्हापूरमधील तालमी या देखील कुस्ती आणि कोल्हापूरचं नातं स्पष्ट करतात. त्याच कोल्हापूरमधून कुस्तीला पुन्हा एकदा पाठबळ मिळणार आहे. त्यामुळे कुस्तीपट्टूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
इतर बातम्या:
Kolhapur Samarjeetsingh Ghatage said Wrestling Competition at Kagal during 4 to 6 October