लातूर: महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं चित्र आहे. मात्र, दुसरीकडे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एका गावात 20 रुग्ण आढळल्यानं प्रशासनासह आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. औसा तालुक्यातील माळूम्ब्रा इथं कोरोनाचे नव्याने २० रुग्ण आढळले आहेत.
राज्यात एकीकडं कोरोनाची रुग्ण संख्या कमी झालेली असताना या गावात 20 रुग्ण आढळल्याने गावकऱ्यांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. औसा तालुक्यातल्या या माळूम्ब्रा गावची लोकसंख्या 750 आहे. गावामध्ये आता आरोग्य विभागाचे पथक पोहंचले असून आवशक्यता असलेल्या भागात कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातल्या आता पर्यंतच्या ऐकून कोरोना रुग्णांची संख्या 91 हजार 212 इतकी झालेली आहे.
बारामतीत गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. मात्र, आता कोरोना रुग्णांच्या संखेत हळूहळू वाढ होऊ लागल्याने बारामतीकरांची चिंता वाढली आहे. काल झालेल्या तपासणीमध्ये कोरोनाचे नवीन 69 रुग्ण आढळून आले आहेत. बारामतीत आतापर्यंत 26774 रुग्ण आढळलेत. यापैकी 25743 रुग्ण बरे झाले आहेत तर 680 मृत्यू झाले आहेत..
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 14 हजारांनी वाढ झाली. सोमवारी नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये दहा हजारांची घट झाल्याने कोरोना ओसरत असल्याचं आशादायक चित्र निर्माण झालं होतं. कालच्या दिवसात (मंगळवारी) 43 हजार 654 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मात्र अॅक्टिव्ह केसेस चार लाखांच्या खालीच आहेत. कालच्या दिवसात 640 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 14 हजारांनी वाढ झाली. सोमवारी नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये दहा हजारांची घट झाल्याने कोरोना ओसरत असल्याचं आशादायक चित्र निर्माण झालं होतं. कालच्या दिवसात (मंगळवारी) 43 हजार 654 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मात्र अॅक्टिव्ह केसेस चार लाखांच्या खालीच आहेत. कालच्या दिवसात 640 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
इतर बातम्या:
दोन डोस घेतलेल्यांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा मिळण्याची शक्यता, अस्लम शेख यांचे संकेत
Corona Vaccine | 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीची क्लिनिकल चाचणी पूर्ण
Latur corona Update 20 corona patient found in malumbra village health department alerted