Akola | शेतशिवारात बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला! कुत्र्याचे लचकेच तोडले, राखणीसाठी जाणारे शेतकरी भयभीत
अकोली जिल्ह्यात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने कुत्र्याचे लचके तोडले. राखणीसाठी शेतात असलेल्या कुत्र्यावरच हल्ला केला. त्यामुळं शेतकरी भयभीत झाले आहेत. बिबट्यापासून संरक्षण मिळावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
अकोला : जिल्हातल्या पातूर तालुक्यात अकोला वनविभाग (Akola Forest Department) अंतर्गत ही घटना घडली. धाडी बल्लाडी शेतशिवारात (Balladi Farm) बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला (Leopard Attack on Dog) केल्याची घटना उघडकीस आली. बल्लाडी येथील पोलीस पाटील चंद्रभान शिंदे हे सकाळी त्यांच्या शेतात गेले होते. त्यांना एक कुत्रा मृत्यू झाल्याचे दिसून आले. घटनास्थळी ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले. या घटनेमुळं शेतकरी भयभीत झाले आहेत. सध्या शेतात हरभरा, गहू हे पीक आहेत. रात्रपाळीला हरभरा, गहू, तीळ रखवालीसाठी शेतकरी शेतात जातात. पण बिबट्याचा परिसरात वावर असल्याने शेतकरी भयभीत झाले आहे.
शेताची राखण कशी करावी
बल्लाडीच्या पोलीस पाटलांच्या शेतात कुत्रा राखण करत होता. या कुत्र्यावरच बिबट्याने हल्ला चढविला. कुत्र्याला अर्धवट खाऊन फेकून दिले. या कुत्र्याचे अक्षरशा लचके तोडले. त्यामुळं शेताची राखण कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अकोली जिल्ह्यात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने कुत्र्याचे लचके तोडले. राखणीसाठी शेतात असलेल्या कुत्र्यावरच हल्ला केला. त्यामुळं शेतकरी भयभीत झाले आहेत. बिबट्यापासून संरक्षण मिळावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
शेतकरी भयभीत
बिबट्याने कुत्र्याचे लचके तोडल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. शेतात राखण कशी करायची असा प्रश्न त्यांना पडला आहे. वन्यजीव येतात. शेताचे नुकसान करतात. कुत्र्याला राखणदार ठेवले तर त्यालाचा खातात. स्वतः गेले नि बिबट्याने हल्ला केला तर जीवावर उद्धार व्हायचं कसं असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. त्यामुळं वनविभागानं वन्यप्राण्यांवर नजर ठेवावी. शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, यासाठी काय उपाययोजना करता येतील त्या कराव्यात, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.