Chandrapur Leopard CCTV | शक्तिनगर वेकोली वसाहतीत बिबट्याचा संचार, घरांसमोर बिबट्याचा वावर, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

अत्यंत चपळ आणि दुर्मिळ असलेल्या रानकुत्र्यांनी वाघिणीचे लक्ष विचलित करून तिची शिकार पळविण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरून वाघिणीला भंडावून सोडण्यासाठी रानकुत्रे पुढे सरसावले होते.

Chandrapur Leopard CCTV | शक्तिनगर वेकोली वसाहतीत बिबट्याचा संचार, घरांसमोर बिबट्याचा वावर, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
शक्तिनगर वेकोली वसाहतीत बिबट्याचा संचारImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 4:11 PM

चंद्रपूर : शहरालगत शक्तिनगर वेकोली वसाहतीत बिबट्याचा संचार बघायला मिळाला आहे. रात्रीच्या सुमारास शक्तिनगर (Shaktinagar) मारुती मंदिर परिसरातील घरांसमोर बिबट्याचा आरामात वावरत असल्याचे दृश्य पुढे आले आहे. या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात हा बिबट्या कैद झाला आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र (Coal Power Station)- दुर्गापूर घनदाट वस्ती व शक्तिनगर भागातून गेल्या काही महिन्यात वनविभागाने 1 वाघ व 3 बिबटे जेरबंद केले आहेत. यानंतरही या भागात वाघ- बिबट्यांच्या हल्ल्यात सातत्याने ग्रामस्थांचे मृत्यू होत आहेत. ताज्या सीसीटीव्ही फुटेजमुळे वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड सरकारी कोळसा कंपनीतील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वसाहतीत बिबट्याचा धोकादायक वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. वनविभागाने तातडीने बिबट्या जेरबंद न केल्यास आणखी मोठी घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पाहा व्हिडीओ

शिकार करून पानवठ्यावर

चंद्रपूरच्या जंगलात बघायला अनोखा थरार बघायला मिळाला. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागात मदनापूर सफारी दरम्यान चंद्रपूरचे वन्यजीवप्रेमी शैलेंद्र भोयर यांना हे थरारक दृश्य अनुभवायला मिळाले. जुनाबाई ही इथली प्रसिद्ध वाघीण. ती एका पाणवठ्यावर शिकार करून पोचली. मात्र शिकारीचा वाटा मिळावा यासाठी तिचा पिच्छा करणाऱ्या रानकुत्र्यांची काही मिनिटात पळता भुई थोडी झाली. अत्यंत चपळ आणि दुर्मिळ असलेल्या रानकुत्र्यांनी वाघिणीचे लक्ष विचलित करून तिची शिकार पळविण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरून वाघिणीला भंडावून सोडण्यासाठी रानकुत्रे पुढे सरसावले होते.

20 कुत्र्यांचा कळप

आवाजाचे वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी वाघिणीला पाणवठ्यावरून हुसकविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने रानकुत्र्यांवर चाल करून पुढे येण्याचा अल्पसा प्रयत्न करताच घाबरलेल्या कुत्र्यांच्या आकांताने जंगल भेसूर झाले. 20 कुत्र्यांच्या कळपाने वाघिणीला घेरण्याचा प्रयत्न मात्र फसला. जुनाबाई दमदार पावले टाकत पुढे आल्यावर रानकुत्रे पाणवठा सोडून पळाले. आजवर कधीही कॅमेऱ्यात कैद न झालेले दृश्य चंद्रपूरचे वन्यजीवप्रेमी शैलेंद्र भोयर यांनी अनुभवले. आपल्या शत्रूला योजनाबद्ध पद्धतीने नामोहरम करण्यासाठी प्रसिद्ध असलेली रानकुत्री जुनाबाईच्या ठाम पवित्र्यांनी जंगलात अखेर दिसेनाशी झाली. शेवंती वाघ जंगलाचा राजाच असतो हे छोट्या प्रसंगातून सिद्ध झाले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.