सोलापूर शहर जिल्हात 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन, जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा, काय सुरु काय बंद?

सातत्याने वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय.

सोलापूर शहर जिल्हात 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन, जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा, काय सुरु काय बंद?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 3:31 AM

सोलापूर : सातत्याने वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय. सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हा निर्णय घेतलाय. त्यांनी याबाबत आज (6 मे) पत्रकार परिषद घेवून माहिती दिली. 8 मे ते 15 मे या काळात सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू असेल. नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जारी करण्यात आलेले निर्बंध पाळावेत असं आवाहनही यावेळी करण्यात आलं (Lockdown of 8 days in Solapur by district collector amid Corona).

सोलापूरमध्ये काय बंद, काय सुरु?

राज्य शासनाकडून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला, किराणा, दूध, मेडिकल, बेकरी आणि पार्सल सेवेसाठी हॉटेल सुरू होती. मात्र सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी 8 दिवसांसाठी लागू केलेल्या या कडक लॉकडाऊनमध्ये या सर्व सेवा बंद राहणार आहेत. दुसरीकडे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून दूध आणि खाद्यपदार्थांच्या घरपोच सेवा अर्थात पार्सल सेवांना सवलत देण्यात आलीय. याशिवाय सर्व अत्यावश्यक सेवा या 8 ते 15 मे दरम्यान बंद राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

सोलापूर शहरातही कडक लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी लॉकडाऊन काळातील उपाययोजनांची माहिती दिली.

सोलापूरमधील कोरोनाची स्थिती काय?

सोलापूर जिल्ह्यात आज (6 मे) 2117 कोरोना रुग्णांची नोंद झाली. याशिवाय एकूण 53 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात एकूण 7259 चाचण्या करण्यात आल्या. त्यातील 1937 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच 38 जणांचा मृत्यू झाला. सोलापूर शहरात एकूण 2316 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 180 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याशिवाय शहरात 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

ग्रामीण भागातील एकूण सक्रिय रुग्णाची संख्या 16,963 इतकी आहे. दुसरीकडे सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये आज 1367, तर शहरात 328 असे एकूण 1695 रुग्ण उपचारानंतर बरे झाले.

हेही वाचा :

उन्हाळ्यात मुख्य दार उघडं ठेवून झोपताय? चोरांनी मोबाईल-टीव्हीसह घर धुवून नेलं

पेपर टाकणारा तरुण इंजिनिअर झाला, लग्नही ठरलं, कोरोनाने भरल्या ताटावरुन 24 वर्षांच्या शुभमला नेलं

मंत्री दत्तात्रय भरणे पीपीई कीट घालून थेट कोविड वार्डात, सोलापूरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये रुग्णांची विचारपूस

व्हिडीओ पाहा :

Lockdown of 8 days in Solapur by district collector amid Corona

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.