VIDEO : ब्रेक फेल झालेला टेम्पो आठवडी बाजारात घुसला, दाम्पत्याचा जागीच मृत्यू, 16 जण जखमी

कंधार येथील महाराणा प्रताप चौकात आठवडी बाजार भरला होता. यावेळी एका अवजड चारचाकी टेम्पोचे ब्रेक अचानक फेल झाले. त्यामुळे नियंत्रण सुटून तो रस्त्याच्या शेजारी असलेल्या टिन पत्र्याच्या दुकानात घुसला

VIDEO : ब्रेक फेल झालेला टेम्पो आठवडी बाजारात घुसला, दाम्पत्याचा जागीच मृत्यू, 16 जण जखमी
नांदेडमधील बाजारातील अपघातानंतरची दृश्यं
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 7:59 AM

नांदेड : ब्रेक फेल झाल्यामुळे भरधाव टेम्पो आठवडी बाजारात घुसून नांदेडमध्ये भीषण अपघात झाला. टेम्पो रस्त्याच्या शेजारील दुकानाला धडकून झालेल्या अपघातात एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर चिरडले गेल्याने जवळपास 16 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतरची भीषण दृष्यं समोर आली आहेत.

नेमकं काय घडलं?

नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे सोमवारी सायंकाळी उशिरा ही घटना घडली. कंधार येथील महाराणा प्रताप चौकात आठवडी बाजार भरला होता. यावेळी एका अवजड चारचाकी टेम्पोचे ब्रेक अचानक फेल झाले. त्यामुळे नियंत्रण सुटून तो रस्त्याच्या शेजारी असलेल्या टिन पत्र्याच्या दुकानात घुसला आणि पलटी झाला.

दाम्पत्याचा जागीच मृत्यू

या अपघातात चार दुकानांचे मोठे नुकसान झाले. तर गोविंद भंगारे (वय 65 वर्ष) आणि मथुरा भंगारे (वय 55 वर्ष) या दोघा पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अपघातात जवळपास 16 जण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातानंतरची आठवडी बाजारातील दृश्यं पाहायला मिळत आहेत.

सोमवार हा बाजाराचा दिवस असल्यामुळे अपघाताच्या वेळी महाराणा प्रताप चौकात मोठी गर्दी होती. जखमींवर कंधार येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर चार गंभीर जखमींना नांदेडला हलवण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ :

मुंबईत बसखाली चिरडून पादचाऱ्याचा मृत्यू

मुंबईतील भांडुप गाढव नाका परिसरामध्ये बेस्ट चालकाचं बसवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली होती. 605 क्रमांकाची ही बस भांडुप रेल्वे स्थानकावरून टेंभीपाडा परिसराकडे जात होती. भांडुपचा गाढव नाका परिसरामध्ये भरधाव वेगात असताना बेस्ट चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि या बेस्ट बसने रस्त्यावरून जात असलेल्या दोन नागरिकांना धडक दिली. या दुर्दैवी घटनेत 82 वर्षांच्या कुंडलिक भगत यांचा जागीच मृत्यू झाला तर 65 वर्षीय रवींद्र तिवारी हे जखमी झाले आहेत.

संबंधित बातम्या :

औरंगाबाद मुंबई महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दोन जणांचा मृत्यू

बेस्ट चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं, रस्त्याने चालणारी 2 माणसं चिरडली, अपघातात 82 वर्षीय आजोबांचा जागीच मृत्यू

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....