Delta Plus variant : महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूने पहिला मृत्यू, आरोग्य मंत्री टोपेंची माहिती

राज्यात डेल्टा प्लस विषाणूच्या संसर्गामुळे (Maharashtra first death from Delta Plus variant) पहिला मृत्यू झाला आहे. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात डेल्टा प्लस (Delta plus virus) विषाणूने एका रुग्णाचा मृत्यू झाला.

Delta Plus variant : महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूने पहिला मृत्यू, आरोग्य मंत्री टोपेंची माहिती
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 2:29 PM

रत्नागिरी : राज्यात डेल्टा प्लस विषाणूच्या संसर्गामुळे (Maharashtra first death from Delta Plus variant) पहिला मृत्यू झाला आहे. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात डेल्टा प्लस (Delta plus virus) विषाणूने एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृत 80 वर्षांची महिला संगमेश्वरमधील रहिवासी होती. डेल्टा प्लस विषाणूग्रस्त महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. डेल्टा प्लसने मृत्यू झालेल्या महिलेला इतरही आजार होते. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिलेल्या माहितीला आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दुजोरा दिला. (Maharashtra first death from Delta Plus variant in Ratnagiri said Health Minister Rajesh Tope)

राज्यात सध्या डेल्टा व्हेरियंटचे 21 रुग्ण आहेत. डेल्टा व्हेरियंटमुळे एक रुग्ण दगावला आहे, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात सांगितलं. डेल्टा व्हेरिएंट बाबतीत सध्या तरी मोठ्या प्रमाणावर रुग्ण नाहीत असं ते म्हणाले. डेल्टा व्हेरियंट बाबतीत सध्या 36 जिल्ह्यामधून नमुने घेण्याचे काम सुरू असून केंद्रीय संस्था NCDC ही राज्य सरकारला मदत करत आहे. सध्या तरी राज्यात कुठलेही निर्बंध लागणार नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात 21 रुग्ण 

 राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराने चिंता वाढवली आहे. राज्यातील 7 जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकारातील 21 रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत 3 हजार 400 नमुन्यांपैकी 21 केसेसमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. हे प्रमाण 0.005 टक्के आहे. त्यामुळे कोरोनाचा डेल्टा प्लस प्रकाराची गंभीर वाढ अद्याप झालेली नाही. हा काळजी करण्यासारखा विषय नसला तरी त्याचे गुणधर्म गंभीर असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

डेल्टा प्लसपासून बचाव कसा करायचा?

व्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचं रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधं घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलं जातं. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे.

नव्या वेरियंटवर लस प्रभावी आहे का?

आपण आतापर्यंत वापरत असलेली लस वेरियंटवर प्रभावी आहे. बर्‍याच वेळा अशा प्रकारे अनुवांशिक बदलांमुळे व्हायरस नष्ट होतात. सार्स कोरोना व्हायरस (Sars Cov 1) अशाप्रकारे संपला होता. म्हणूनच, जेव्हा जेव्हा व्हायरस बदलतो तेव्हा फक्त धोका असतो, असं म्हणता येत नाही. कधीकधी ते खूप कमकुवत देखील होतात आणि त्याचा प्रभाव कमी होतो. नागरिकांनी कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता लस घ्यावी.

संबंधित बातम्या 

महाराष्ट्रात 7 जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, प्रमाण 0.005 टक्के, पण गुणधर्म चिंताजनक – राजेश टोपे

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...