कृष्णाकाठाला दिलासा, काही ठिकाणी कृष्णा नदीची पातळी स्थिर, सांगली शहरात मात्र पाणीच पाणी!

सांगली शहरातील कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 55 फुटांवर पोहोचली आहे. वाढलेल्या पातळीमुळे सांगली शहर हे जलमय झाले आहे.

कृष्णाकाठाला दिलासा, काही ठिकाणी कृष्णा नदीची पातळी स्थिर, सांगली शहरात मात्र पाणीच पाणी!
सांगलीतली पाणी पातळी...
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 2:49 PM

सांगली :  सांगली शहरातील कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 55 फुटांवर पोहोचली आहे. वाढलेल्या पातळीमुळे सांगली शहर हे जलमय झाले आहे. जवळपास साठ टक्के शहर कृष्णेच्या पुराच्या विळख्यात सापडलेलं आहे. तर ताकारी आणि भिलवडी याठिकाणी कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरु लागली. रात्रीपर्यंत पाणी स्थिर होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या प्रमुख ज्योती देवकर यांनी दिलीय. शहरात आलेल्या पुराने 2005 मध्ये आलेल्या महापुराची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Maharashtra Flood Update Krishna River Water stable Level)

सांगली शहरात पाणीच पाणी

सध्या सांगली शहरातला शहरी भाग पूर्ण पाण्याखाली गेला आहे. स्टेशन चौकापासून, शिवाजी स्टेडियम, मीरा हाउसिंग सोसायटी, संपूर्ण वखार भाग, एसटी स्टँड परिसर, सांगली शहरातला विस्तारित भाग असणारा शामराव नगर यासह सांगली- कोल्हापूर रोड संपूर्ण पाण्याखाली गेला आहे.

हजारो नागरिकांचं स्थलांतर

या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना प्रशासन, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी हे बोट आणि इतर माध्यमातून बाहेर काढण्याचं काम करत आहेत. भीषण अशी परिस्थिती सध्या सांगली शहरात निर्माण झालेली आहे. सांगली शहरातले जवळपास एक हजाराहून अधिक घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर लाखो लोकांचं स्थलांतर झालं आहे. स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांसाठी पालिका प्रशासनाच्या वतीने शहरातल्या महापालिकांच्या शाळांमध्ये आणि इतर खासगी ठिकाणी तात्पुरते निवारा केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत.

पाण्याची पातळी ओसरतीय

दुसऱ्या बाजूला कृष्णा नदी आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला आहे. त्याबरोबर चांदोली आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे. तर पावसाने उघडीप दिल्याने आता पाण्याची पातळी ताकारी व भिलवडी याठिकाणी उतरु लागलेली आहे. तकारी या ठिकाणी जवळपास 8 फुटाने पाण्याची पातळी उतरली आहे. तर भिलवडी याठिकाणी 2 फुटांने उतरली असून संथ गतीने पाण्याची पातळी ओसरत आहे.

सांगली शहरातील कृष्णा नदीची पाणीपातळी स्थिर

तसेच सांगली शहरातील कृष्णा नदीची पाणीपातळी आता स्थिर झालेली आहे. दुपारनंतर ही पाण्याची पातळी हळूहळू ओसरू लागेल, असा अंदाज सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती ज्योती देवकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केला.

(Maharashtra Flood Update Krishna River Water stable Level)

हे ही वाचा :

लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

VIDEO | चिपळूणमध्ये दुकानदारांसमोर उद्धव ठाकरेंनी हात जोडले, भास्कर जाधव म्हणाले, साहेब तुम्ही हात नका जोडू

“पवार साहेबांना म्हटलं मी थांबतो, ते म्हणाले निवडणूक तूच लढवणार, अजितलाही सांगू नकोस” दत्ता भरणेंचा गौप्यस्फोट

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.