3 किलोमीटर अ‍ॅथलिस्ट स्पर्धेत गोंदियाचा परीमोल देशात दुसरा, असंख्य अडचणींवर मात करत दैदिप्यमान यश

घरची बेताची परिस्थिती... सरावासाठी कोणत्याही सुविधा नसताना गोंदियातील 18 वर्षीय परीमोल परसमोडे या धावपटूने जयपूर मध्ये झालेल्या अंडर 19 नॅशनल स्पर्धेत 3 किलोमीटर शर्यतीत दुसरा क्रमांक पटकाविला.

3 किलोमीटर अ‍ॅथलिस्ट स्पर्धेत गोंदियाचा परीमोल देशात दुसरा, असंख्य अडचणींवर मात करत दैदिप्यमान यश
परीमोल परसमोडे
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 1:42 PM

गोंदिया :  घरची बेताची परिस्थिती… सरावासाठी कोणत्याही सुविधा नसताना गोंदियातील 18 वर्षीय परीमोल परसमोडे या धावपटूने जयपूरमध्ये झालेल्या अंडर 19 नॅशनल स्पर्धेत 3 किलोमीटर शर्यतीत दुसरा क्रमांक पटकाविला. महत्वाचे म्हणजे कोणताही कोच (प्रशिक्षक) नसताना परिमोलने मिळविला हे यश मिळवले आहे. शर्यतीला जाण्यापूर्वी रेल्वेचे आरक्षित तिकीट रद्द झाल्याने सामान्य तिकीट खरेदी करीत शौचालयात समोर उभे राहत त्याने प्रवास केला. त्याला पैसे नसल्यामुळे दोन रात्र त्याने रेल्वे स्थानकावरील फलाटावर काढली.

3 किलोमीटर अॅथलिस्ट स्पर्धेत गोंदियाचा परीमोल देशात दुसरा

गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या माणेकसा गावातील परिमोल परसमोडे या धावपटूने वयाच्या 18 व्या वर्षी दौड स्पर्धेचे कुठलेही प्रशिक्षण न घेता नुकतेच जयपूर या ठिकाणी पार पडलेल्या राष्ट्रीय युवा खेळ अंडर 19 या चॅम्पियन 3 किलोमीटर अॅथलिस्ट स्पर्धेत भाग घेत देशात दुसरा क्रमांक पटकावीत 3 किलोमीटर स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले आहे.

असंख्य अडचणींवर मात करत दैदिप्यमान यश

आमगाव तालुक्यातील 500 लोकवस्तीचं माणेकशा गाव, याच गावात नॅशनल खेळणारा 18 वर्षीय तरुण परिमोल परसमोडे अत्यंत हलाकीच्या परिस्थिती जीवन जगणाऱ्या परीमोलने नुकतेच जयपूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय युवा खेळ अंडर 19 च्या अॅथलिस्ट चॅम्पियनशिप 3 किलोमिटर रनिंग स्पर्धेत भाग घेत देशात दुसरा क्रमांक पटकावला. ज्या गावचं नाव देशाच्या नकाशात शोधून दिसणार नाही अशा गावाचं नाव त्यांने देशात उज्वल केलं आहे. परीमोलने १० वी पर्यंतचे शिक्षण घेतले असून घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पुढील शिक्षण तो घेऊ शकला नाही.

खडतर ‘प्रवास’

परीमोल गावात मिळेल ते काम करून आपल्या कुटूंबीयांना मदत करतो. तर परीमोलचे वडील हे शेती करत आपल्या कुटुंबाचा गाडा चालवित आहेत. परीमोलला लहानपणापासूनच धावण्याची आवड असल्याने तो रोज सकाळी 4 वाजता उठून 10 किलोमीटर धावतो. सुरुवातीला गावातील तरुण त्याला वेडा ठरवीत होते, हा कशासाठी रोज सकाळी उठून धावतो, मात्र गावातील लोकांना तब्ब्ल तीन वर्षानंतर आज कळालंय की परिमोल कशासाठी धावत होता . फेसबुकवर अॅथलिस्ट राष्ट्रीय युवा खेळ अंडर 19 या चॅम्पियनशिप रनिंग स्पर्धेची माहिती आली आणि परिमोलने मित्राच्या मदतीने ऑनलाईन नामांकन दाखल केलं. आणि हातमजुरीतून गोळा केलेल्या पैसातून जयपूरला मित्राच्या मदतीने रेल्वेचे ऑनलाईन तिकीट बुक केले मात्र तेही वेटींग असल्याने कन्फर्म होऊ शकले नाही म्हणून परिमलने गोंदिया रेल्वे स्टेशन गाठत ट्रेन पकडली. मात्र टीटीने ऑनलाईन तिकीट कन्फर्म नसल्याने प्रवास करता येणार नसल्याचे सांगितले. तरीही परिमोल खचून गेला नाही. त्याने टीटीकडे प्रवास करण्यासाठी विनवणी केली असता 600 रुपयाचं सामान्य रेल्वे तिकीट तयार करून देत टीटीने प्रवासाकरिता परवागी दिली.

परिमोलने रेल्वे गाडीतील शौचालयजवळ उभा राहत आपला प्रवास करीत जयपूर गाठले. मात्र परिमोल जवळ पैसे नसल्याने आणि रनिंग स्पर्धाही दुसऱ्या दिवशी असलयाने परीमोलने एक रात्र रेल्वे स्थानकावर काढली व दुसऱ्या दिवशी स्पर्धेत भाग घेतला आणि अंडर 19 नॅशनल स्पर्धेत 3 किलोमीटर शर्यतीत दुसरा क्रमांक पटकाविला.

कोणतेही प्रशिक्षक नसताना दैदिप्यमान यश

कुठलाही कोच (प्रशिक्षक) नसताना या धावपटूचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. जयपूर गाठत परिमोलने रौप्य पदक पटकावत गोंदिया जिल्ह्याचं नाव रोशन केला आहे, तर कुठल्याली प्रशिक्षक नसतानासुद्धा परिमोलने यशाचं शिखर गाठल्याने त्याचं सर्वच स्थरावर कौतुक केलं जात आहे.

(maharashtra Gondia Parimol is second in the country in the 3 km athletics competition)

हे ही वाचा :

VIDEO | तू आमच्या गटात का येत नाहीस? ग्रामपंचायतीच्या महिला सदस्याच्या घरावर टोळक्याने हल्ला

पेट्रोल-डिझेल स्वस्त करायला ठाकरे सरकारचा विरोध? अजित पवारांच्या भूमिकेनं विरोधकांना आयतीच संधी?

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.