नोकरीच्या मागं न लागता कृषी क्षेत्रात क्रांती आणा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं आवाहन

कोकण कृषी विद्यापीठ,दापोली येथे 39 वा पदवीदान समारंभ संपन्न झाला. यावेळी कुलगुरू संजय सावंत यांच्यासह इतर मान्यवर देखील हजर होते. या सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कृषी राज्यमंत्री दादा भुसे यांनी ऑनलाईन पद्धतीनं हजेरी लावली होती.

नोकरीच्या मागं न लागता कृषी क्षेत्रात क्रांती आणा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं आवाहन
भगतसिंह कोश्यारी
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 6:15 PM

रत्नागिरी: कोकण कृषी विद्यापीठ,दापोली येथे 39 वा पदवीदान समारंभ संपन्न झाला. यावेळी कुलगुरू संजय सावंत यांच्यासह इतर मान्यवर देखील हजर होते. या सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कृषी राज्यमंत्री दादा भुसे यांनी ऑनलाईन पद्धतीनं हजेरी लावली होती. आजच्या पदव्युत्तर पदवीच्या 132, पीएचडीच्या 30 आणि पदपीपूर्व अभ्यासक्रमाच्या 1925 विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. यावेळी गोल्ड मेडेलिस्ट आणि पीएचडी घेणारे विद्यार्थी प्रत्यक्ष कार्यक्रमाला हजर होते. तर उर्वरित विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं पदवी बहाल करण्यात आली.

भारत अन्नधान्य उत्पादन, दुग्ध उत्पादन व मत्स्य उत्पादनांच्या बाबतीत स्वयंपूर्णच नाही तर निर्यातदार देखील झाला आहे. कृषी क्षेत्रांत नैसर्गिक शेती, पेटेंट, भौगोलिक मानांकन यांमुळे शेतकऱ्यांसाठी समृद्धीची नवनवी दालने उघडत आहेत. अशावेळी कृषी क्षेत्रातील पदवीधारकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.

राज्यपाल नेमकं काय म्हणाले?

प्राचीन काळी भारत हा कृषीप्रधान देश होता. देशात दुध-दह्याच्या नद्या वाहत होत्या. कृषी व कृषीवर आधारित उद्योग, फलोत्पादन यांमुळे देश संपन्न होता. मधल्या काळात देशाने अनेक दुष्काळ पहिले परंतु त्यानंतर हरित क्रांती आली. अलीकडच्या काळात सफेत क्रांती व नील क्रांतीच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. ‘उत्तम खेती, मध्यम बान, निकृष्ट चाकरी, भीख निदान’ या जुन्या काळातील प्रचलित म्हणीचा दाखला देऊन राज्यपालांनी युवकांना कृषी क्षेत्रात येण्याचे आवाहन केले.

कृषी क्षेत्रातील संशोधन पाहून प्रभावित

कृषी विद्यापीठांमध्ये नवनवे संशोधन होत असून आपण नुकतेच परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधन पाहून आल्याचे राज्यपालांनी सांगितले. या संशोधनामुळे आपण प्रभावित झाल्याचे सांगून हे संशोधन प्रयोगशाळेतून शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

भारतातील सामान्य शेतकऱ्याकडे देखील शेतीचे पारंपारिक ज्ञान असून कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांकडून देखील अनेक गोष्टी शिकल्या पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी राज्याचे कृषिमंत्री व विद्यापीठाचे प्र-कुलपती दादाजी भुसे यांनी संबोधन केले तर कृषि वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी यांनी दीक्षांत भाषण दिले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी विद्यापीठ अहवालाचे वाचन केले.

इतर बातम्या:

महापुराचा फटका, कोट्यवधीचं धान्य सडलं, कृषी विद्यापीठाला खत बनवण्यासाठी सडलेल्या तांदळासह गहू देणार

“स्वातंत्र्यांच्या लढाईत चड्डीवाले इंग्रजांसोबत होते, आम्हाला विकत घ्यायला भाजपला अनेक अंबानी उभे करावे लागतील”

Maratha Reservation : संभाजीराजे छत्रपती राष्ट्रपतींच्या भेटीला, राजेंसोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळात कोणकोणते नेते?

Maharashtra Governor Bhagatsingh Koshyari said Agriculture Graduate students make efforts for agricultural revolution

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.