कोल्हापूर : आतापर्यंत नागाने बेडूक, उंदीर, सरडा यासारख्या प्राण्यांना खाल्ल्याचं तुम्ही पाहिलं किंवा ऐकलं असेल. मात्र कोल्हापुरात चक्क एका नागाने सापाला गिळल्याचं उघडकीस आलं आहे.
काय आहे प्रकार?
एका सापाने दुसऱ्या सापाला गिळल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पोर्ले तर्फे ठाणे येथे घडली. नाग हा मुख्यत्वे बेडूक, उंदीर, सरडा यासारखे प्राणी भक्ष्य करतो. मात्र नागाने घोणस जातीच्या सापाला गिळल्याचे समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गोठ्यात नाग सापडला
पोर्ले तर्फे गावातील शामराव चेचर यांच्या गोठ्यात नाग फणा काढून उभा होता. त्यामुळे त्याच्या सुटकेसाठी शामरावांनी सर्पमित्रांना बोलावले. सर्पमित्र आणि चेचर यांनी हा नाग पकडून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे ठरवले.
त्याच वेळी नागाने गरळ ओकण्यास सुरुवात केली. इतक्यात या नागाच्या जबड्यातून भला मोठा मृत पावलेला घोणस जातीचा साप बाहेर पडताना दिसला.
या अनोख्या प्रकाराची चर्चा लागलीच परिसरात सुरु झाली. हे पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती. त्यांनी ही घटना कॅमेरात कैद करण्यात उसंत दवडली नाही. जर सापच दुसऱ्या सापाला खात असेल तर अन्न साखळी धोक्यात आल्याचं सर्पमित्रांचं म्हणणं आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईसह 23 महापालिका निवडणूकांवर टांगती तलवार, कोणत्या पालिकेतल्या किती जागा खुल्या होणार?
ड्रायव्हरला डुलकी, पंढरपूरहून परतणारा भाविकांचा टेम्पो उलटला, 35 जण जखमी
एक खाते अनेक फायदे; जाणून घ्या पीपीएफ खात्यामधील गुंतवणुकीचे फायदे