महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी राज्य पेटवायचा डाव होता, यशोमती ठाकूर यांचा आरोप
काही लोकं अमरावती शहरात आतंक करत होते. त्यावेळी काही मुस्लीम लोकं मंदिराचं रक्षण करत होते. तर, काही हिंदू लोकं मशिदीचं रक्षण करत होते. हाच माझा देश आहे, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.
यवतमाळ: काही लोक अमरावती शहरात आतंक करत होते. त्यावेळी काही मुस्लीम लोकं मंदिराचं रक्षण करत होते. तर, काही हिंदू लोकं मशिदीचं रक्षण करत होते. हाच माझा देश आहे. माझा धर्म आणि माझी जात हा तिरंगाच आहे, असं अमरावतीच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला व बाल कल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र पेटवण्याचं षडयंत्र होतं. महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी पेटवायचा डाव होता, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी विरोधी पक्षांचं नाव न घेता केला.
देशात तिरस्काराची भावना वाढवली जातीय
जय श्रीराम म्हटलं की संपला का सगळं, संपला का संविधान? असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करतोय. देशात जातीय दंगली घडवल्या जातात. दोन्ही कट्टरपंथी हे चांगले मित्र असतात आणि आपल्याला येडं बनवतात. आपल्या देशात तिरस्काराची भावना वाढवण्याचं काम सुरु आहे, असं महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत, त्या माजी आमदार अनंतराव देवरसकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
राज्यात आणि देशात हिंसा वाढवण्याचं काम
राज्यात आणि देशात हिंसा वाढवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केलं जातंय. आपण संविधान दिवस साजरा करतोय आणि दुसरीकडे रामच आपला धर्म असल्याचं बोललं जातंय मात्र तिरंगा हाच आपला धर्म असला पाहिजे. संविधान दिवस आहे एकोप्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी मी बोलली नाही तर कुठंतरी चुकल्या सारखं होईल, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. मी जय श्रीराम म्हणाले नाही, राम रहीम म्हटलं नाही. मी संविधान साजरा केला त्यासाठी वेळ झाला. अमरावती 12 तारखेला मोर्चा झाला, नको त्या घटना घडल्या. त्यानंतर मी फेसबुक लाईव्ह केलं. त्याच्या खालच्या कमेंट वाचल्या आणि आपल्या देशात काय चाललंय असा प्रश्न पडल्याचं यशोमती ठाकूर म्हणाल्या.
दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप
उमरखेड येथे अनंतराव देवसरकर यांच्या स्मृतिदिना निमित्य या कार्यक्रमात 1000 दिव्यांग बांधवाना मोफत साहित्य वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने यावेळी नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
इतर बातम्या:
Maharashtra Minister Yashomati Thakur Said some people plan riots in amravati for taking power of state in hand