राष्ट्रवादीच्या सर्व आमदार-खासदारांचं महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना, जनतेनेही फूल ना फुलाची पाकळी द्यावी : अजित पवार
महाराष्ट्रातील जनता नैसर्गिक संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करत असते. जनतेने फूल ना फुलांची पाकळी म्हणून मदत करावी, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
सांगली: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पूरग्रस्त जनतेशी संवाद साधल्यानंतर अजित पवार यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेतली. सध्याच्या संकटात राज्य सरकार, केंद्र सरकार मदत करत आहे, राष्ट्रवादीचे सर्व आमदार,खासदार, मंत्री यांचं एक महिन्याचं मानधन देणार आहे. जलसंपदा मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी हा निर्णय घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील जनता नैसर्गिक संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करत असते. जनतेने फूल ना फुलांची पाकळी म्हणून मदत करावी. सध्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर जे संकट कोसळलंय त्यांना जनतेने फूल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करावी,असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
जलसंपदा विभागासोबत कर्नाटक सरकारने समन्वय साधला
2019 मध्ये फडणवीस यांच्या काळात प्रवीणशिंह परदेशी यांच्या अध्यक्षेतेखाली समिती गठीत गेली होती. यंदा जलसंपदा मंत्र्यांनी कर्नाटक सरकारने समनव्य साधला. राज्याचा एक अधिकारी अलमट्टी धरणावर थांबलेला होता. दोन्ही राज्यांनी समन्वय ठेऊन काम केलं, असं अजित पावर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी वैधकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. औषधाचा पुरवठा कमी पडू देणार नाही. सांगली येथे पिण्याचे पाण्याचे टँकर उपलब्ध करून देत आहोत, असंही अजित पवार म्हणाले.
सात जिल्ह्यांना फटका
सध्याच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सात जिल्हे बाधित झाले आहेत, सातारा ,सांगली,कोल्हापूर पुणे जिल्ह्याचा थोडा बाधित झाला आहे.मी सगळी माहिती घेतली आहे. दोन दिवसात या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. शिराळा ,वाळवा, पलूस भागात मोठे नुकसान झालं आहे. 80 बोट आपल्याकडे आहेत एनडीआरएफची दोन पथक काम करत आहेत. बऱ्याच लोकांना स्थलांतरित करावे लागलं आहे.
नोडल अधिकारी नेमणार
आता बरेच जण दौरे करत आहेत, केंद्र सरकारचे मंत्री येत आहेत. त्यांचा अधिकार आहे. आम्ही नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करणार आहोत. नोडल अधिकारी मंत्र्यांच्या दौऱ्यासोबत असतील. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी हे दालनात बसूनच आता मदती संदर्भात काम करतील, असं अजित पवार म्हणाले. अधिकाऱ्यांना हे कुठे ते कुठे चालणार नाही, अधिकाऱ्यांना सुद्धा मदतीसाठी वेळ हवा आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या दौऱ्यात जिल्हाधिकारी नसल्यानं संताप व्यक्त केला होता.
इतर बातम्या:
उर्मिला मातोंडकर यांच्या पंकजा मुंडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पंकजा म्हणतात, चला…
(Maharashtra Rain Update Ajit Pawar declared NCP MP and MLA MLC members one month salary will gave to flood affected peoples help)