कोरोनामुक्त भागात शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सचा विचार, 5 सप्टेंबरपर्यंत शिक्षकांचं लसीकरण, राजेश टोपेंची माहिती

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शाळा सुरु करण्यासाठी टास्क फोर्सचा विचार सुरु असल्याचं सांगितल्यानं नेमका निर्णय कधी होणार याची वाट पाहावी लागणार आहे.

कोरोनामुक्त भागात शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सचा विचार, 5 सप्टेंबरपर्यंत शिक्षकांचं लसीकरण, राजेश टोपेंची माहिती
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 4:18 PM

जालना : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शाळा सुरु करण्यासंदर्भात एक महत्वाचं विधान केलं आहे. राज्यातील काही जिल्हे आणि शाळा जिथे पॉझिटिव्ह रुग्ण नाहीत त्या बाबत टास्क फोर्सचा शाळा आणि जिल्हे सुरू करण्याबत विचार सुरु आहे. तसेच 5 तारखे पर्यंत शिक्षकांचे डबल लसीकरण करण्याबाबत स्पेशल ड्राइव्ह घेणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत. आरोग्यमंत्र्यांनी शाळा सुरु करण्यासाठी टास्क फोर्सचा विचार सुरु असल्याचं सांगितल्यानं नेमका निर्णय कधी होणार याची वाट पाहावी लागणार आहे.

शिक्षकांच्या लसीकरणासाठी मोहीम

शिक्षकांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकार विशेष मोहीम राबवणार आहे. 5 तारखे पर्यंत शिक्षकांचे डबल लसीकरण करण्याबाबत स्पेशल ड्राईव्ह घेणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत. राज्यातील काही जिल्हे आणि शाळा जिथे पॉझिटिव्ह रुग्ण नाहीत त्या बाबत टास्क फोर्सचा शाळा आणि जिल्हे सुरू करण्याबत विचार सुरु आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांचं लसीकरण करुन घेणं आवश्यक असल्यानं यासंदर्भात राज्य सरकारकडून पावलं टाकण्यात येत आहेत.

आपल्याला सावध होण्याची गरज

केरळमध्ये ओनम उत्सवामध्ये 30 ते 35 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली होती. आपल्याला सावध होणे आणि काळजी घेणे गरजेचे आहे, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. याबाबत केंद्राने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याची अमलबजावणी राज्य करेल आणि त्या बाबत मुख्यमंत्री सूचना देतील, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

शाळा सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील: अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. बऱ्याच जणांचं म्हणनं आहे शाळा सुरु करा, काही जणांचं म्हणनं शाळा सुरु करु नका असं आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय टास्क फोर्ससोबत चर्चा करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं त्यांनी सांगितलं होतं. राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं कोरोना लसीकरण प्राधान्यानं करावं, असा निर्णय घेण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं शालेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं लसीकरण होणं आवश्यक आहे. जसं दिव्यांग व्यक्ती, देहविक्रय करणाऱ्या महिलांना दोन्ही लसीकरणात प्राधान्य दिलं त्याप्रमाणं शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येईल, असं अजित पवार म्हणाले होते.

महाराष्ट्र कोरोना अपडेट

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या काही कमी होत नसल्याचं चित्र आहे. शनिवारी राज्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेले 4 हजार 831 रुग्ण आढळून आले आहेत. दुसरीकडे 126 व्यक्तींचा कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 64 लाख 52 हजार 273 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत 1 लाख 37 हजार 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

इतर बातम्या:

मुख्यमंत्री शाळांसदर्भात निर्णय घेतील, पुणे आणि पिंपरीत शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य: अजित पवार

पुण्यातल्या अॅमिनिटी स्पेसच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीची भूमिका काय? उद्या अजित पवारांनी बोलावली महत्वाची बैठक

Maharashtra School Reopen Health Minister Rajesh Tope said task force discuss to start school at covid free area of state

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.