अकोला जिल्ह्यात केवळ दोन विद्यार्थी नापास, एक मुलगा-एक मुलगी अनुत्तीर्ण, जिल्ह्याचा निकाल 99.99%

Maharashtra SSC result : काल दहावीचा निकाल जाहीर झाला. या निकालात अकोला जिल्ह्यात एक विद्यार्थी एक विद्यार्थीनी नापास झालेत.

अकोला जिल्ह्यात केवळ दोन विद्यार्थी नापास, एक मुलगा-एक मुलगी अनुत्तीर्ण, जिल्ह्याचा निकाल 99.99%
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 9:01 AM

अकोला : काल दहावीचा निकाल (Maharashtra SSC Result) जाहीर झाला. या निकालात अकोला जिल्ह्यात एक विद्यार्थी एक विद्यार्थीनी नापास झालेत. दुपारी 1 वाजल्यापासून सर्व्हर बंद पडल्याने दहावीचा निकाल लागून देखील पालक व विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही.

एक मुलगा आणि एक मुलगी अनुत्तीर्ण

अकोला जिल्ह्यात 25, 633 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्या पैकी बार्शिटाकळी व अकोला तालुक्यातील प्रत्येकी एक विद्यार्थी नापास झाला. जल्ह्यात 25, 631 विद्यार्थी पास झाले. जिल्ह्याचा निकाल 99.99 टक्के इतका लागला आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा एक मुलगा व एक मुलगी नापास झालेत म्हणजे जिल्ह्यात पहिल्यांदाच मुले व मुली हे दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण होण्यामध्ये टक्केवारीच्या दृष्टीने समसमान संख्येत होते.

पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रेकॉर्डब्रेक

जिल्ह्यात पहिल्यांदाच दहावीत इतक्या मोठ्या संख्येत विद्यार्थी पास झाले आहे. कोरोना संकटात यंदा दहावीची परीक्षा झाली नाही. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. पण, हा निकाल विद्यार्थी व पालकांना ऑनलाईन उपलब्ध झाला नाही. अनेक प्रयत्न करुन देखील निकालचे संकेतस्थळ बंदच असल्याने अखेर विद्यार्थ्यांचा व पालकांचा हिरमोड झाला व त्यांनी निकाल पाहण्याकडे दूर्लक्ष केले.

दोन विद्यार्थी अनुत्तीर्ण

जिल्ह्यातील अकोला तालुक्यात 10,120 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 10,119 विद्यार्थी हे पास झाले आहे. बार्शिटाकळी तालुक्यातील 2,076 विद्यार्थी परीक्षेला बसले होते या पैकी एक विद्यार्थ्यीनी नापास झाला. तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, पातूर, अकोट तालुक्याचा निकाल शतप्रतिशत लागला. अकोट तालुक्यात 3,649, तेल्हारा 2,387, बाळापूर 3083, पातूर 1933,मूर्तिजापूर 2394 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

जिल्ह्याचा निकाल 99.99 टक्के

जिल्ह्यात 13,395 मुले परीक्षेला बसली होती त्या पैकी अकोला तालुक्यातील एक विद्यार्थी नापास झाला. तर जिल्ह्यात 12,238 विद्यार्थीनी बसल्या होत्या. त्या पैकी बार्शिटाकळी तालुक्यातील एक विद्यार्थीनी परीक्षेत नापास झाली. जिल्ह्यात या दोन विद्यार्थी नापास झाल्याने 99.99 टक्के निकाल लागला. दरम्यान, संकेत स्थळावर माहिती न मिळाल्याने नेमके किती गुण विद्यार्थ्यांना प्राप्त झाले याची माहिती विद्यार्थी, पालक व शिक्षकांना मिळाली नाही.

(Maharashtra SSC result Only two students failed in Akola district, one boy and one girl failed, district result 99.99%)

हे ही वाचा :

Maharashtra SSC Result 2021: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेणार; 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणी

SSC website crash : 16 लाख विद्यार्थी 6 तासांपासून ताटकळत, बोर्ड म्हणतं अजून थोडी वाट पाहा!

Maharashtra SSC Result 2021: दिव्यांग विद्यार्थ्यांची ‘नेत्रदीपक’ कामगिरी; 97.84% निकाल लागला!

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.