बच्चू कडूंचा वाढदिवस, बेघर अपंगाला घर आणि सायकल, रामदासांना अश्रू अनावर
नगर जिल्ह्यातल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. अपंग असलेल्या आणि बेघर असलेल्या व्यक्तीला घर तीनचाकी सायकल देऊन बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त गरीबाचे अश्रू पुसण्याचे काम प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलं. | Bacchu Kadu Birthday
अहमदनगर : राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचा नुकताच वाढदिवस पार पडला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन केले गेलं होतं. नगर जिल्ह्यातल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. अपंग असलेल्या आणि बेघर असलेल्या व्यक्तीला घर तीनचाकी सायकल देऊन बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त गरीबाचे अश्रू पुसण्याचे काम प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलं. (Maharashtra State minister Bacchu Kadu Birthday, home and bicycle to the homeless disabled karjat Nagar)
अकोला जिल्ह्यातल्या अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू कडू यांची शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग जणांसाठी काम करणारा नेता म्हणून राज्यभर ओळख आहे. त्यांच्या न्याय हक्कांसाठी राज्यातील कुठल्याही जिल्ह्यात जाऊन आंदोलन करुन त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आतापर्यंत बच्चू कडू यांनी केलंय. बेघर आणि अपंग लोकांसाठी बच्चू कडू यांचं मोठं काम आहे. त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला प्रहार संघटना विविध कार्यक्रमांचं आयोजन करते. या वर्षीदेखील नगर जिल्हा प्रहार संघटनेच्या वतीने बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं.
बच्चू कडूंचा शब्द कार्यकर्त्यांनी पाळला, रामदासांना अश्रू अनावर
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे राहणाऱ्या रामदास पानपट या अपंग व्यक्तीला घर नव्हतं. आमदार बच्चू कडू हे अहमदनगर जिल्ह्यात आले होते तेव्हा रामदास यांना घर देण्याचा त्यांनी शब्द दिला होता. त्यानुसार आपल्या नेत्याने दिलेल्या शब्दाखातर कार्यकर्त्यांनी नेत्याच्या वाढदिवसालाच रामदास यांना घर दिलं. यावेळी रामदास यांना अश्रू अनावर झाले. आजच्या घडीला शब्द पाळणारा नेता दिसत नाही मात्र बच्चू कडू हे संवेदनशील आहेत. गरिबांप्रति त्यांच्या मनात आस्था आहे. जनतेविषयी बांधिलकी आहे, अशा भावना यावेळी रामदास यांनी व्यक्त केल्या.
अपंगाच्या डोक्यावर मजबूत घर, फिरण्यासाठी तीन चाकी सायकल
बच्चू कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रामदास यांना ग्रामपंचायत हद्दीमध्ये एक घर आणि फिरण्यासाठी तीन चाकी सायकल देण्यात आलीय. बच्चू कडू यांनी दिलेला शब्द पाळल्याने रामदास यांना आनंदाश्रू अनावर झाले, तर आपल्या नेत्याचा वाढदिवस देखील चांगल्या पद्धतीने साजरा झाल्याचं समाधान कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं.
(Maharashtra State minister Bacchu Kadu Birthday, home and bicycle to the homeless disabled karjat Nagar)
हे ही वाचा :
सहा वर्षांपासून मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना श्रीगोंदा पोलिसांच्या बेड्या
खबऱ्याने माहिती दिली, कर्जत पोलिसांनी ट्रॅप लावला, दूध भेसळीची लाखो रुपयांची पावडर जप्त!