तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांवर त्रास दिल्याचा आरोप, अहमदनगरमध्ये आरोग्य अधिकाऱ्याची आत्महत्या

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य अधिकाऱ्याने वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलीय. त्यांनी तहसिलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत.

तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांवर त्रास दिल्याचा आरोप, अहमदनगरमध्ये आरोग्य अधिकाऱ्याची आत्महत्या
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 11:19 PM

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य अधिकाऱ्याने वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलीय. डॉ. गणेश शेळके असं या 45 वर्षीय वैद्यकीय अधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांनी लसीकरण सुरु असतानाच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (6 जुलै) दुपारी 1 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे (Medical Officer Dr Ganesh Shelke suicide in Pathardi Ahmednagar allege on Tehsildar and Collector).

डॉ. गणेश शेळके लसीकरणाच्या कामासाठी पाथर्डी तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रात होते. यावेळी त्यांनी आत्महत्येपूर्वी कर्मचाऱ्यांकडे एक कागद आणि पेन मागितला. त्यानंतर त्यांनी उपकेंद्रातील त्यांच्या दालनाचा दरवाजा आतून बंद करुन घेतला. बराचवेळ झाला तरी दरवाजा उघडला गेला नाही. म्हणून कर्मचाऱ्यांनी शेळके यांना आवाज दिला. आवाज देऊनही त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा सुरु केला. अखेरीस दरवाजा तोडून आत पाहिले असता डॉ. शेळके यांनी फॅनला गळफास घेतल्याचे दिसून आले.

आत्महत्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली, वरिष्ठांच्या त्रासाचा उल्लेख

डॉ. शेळके यांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केलीय. यात तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान दराडे, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी आपल्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा स्पष्ट उल्लेख त्यांनी केलाय. वेळेवर पेमेंट न करणे आणि कामाचा अतिरिक्त भार यामुळे त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलंय.

सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलं?

“मी डॉ. गणेश गोवर्धन शेळके आत्महत्या करत आहे. यास कारणीभूत तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान दराडे व प्रशासकीय सेवेतील तहसीलदार आणि कलेक्टर जबाबदार असतील. वेळेत पेमेंट न करणे, कामाचा अतिरिक्त भार आणि पेमेंट कपातीची धमकी देणे या कारणाने मी आत्महत्या करत आहे.”

हेही वाचा :

Swapnil Lonkar Suicide | अमित ठाकरे पुण्यात स्वप्नील लोणकरच्या आई-वडिलांच्या भेटीला

शिक्षकाची राहत्या घरी आत्महत्या, गळफास घेऊन संपवलं आयुष्य

सततचे काम, रजेलाही नकार, वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या, कोल्हापुरात खळबळ

व्हिडीओ पाहा :

Medical Officer Dr Ganesh Shelke suicide in Pathardi Ahmednagar allege on Tehsildar and Collector

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.