शिवसेनेचे महेश कोठे आणि एमआयएमचे तौफिक शेख यांचा राष्ट्रवादी प्रवेश लांबला; वाचा कारण काय?

शिवसेनेचे नेते महेश कोठे आणि एमआयएमचे नेते तौफिक शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश पुन्हा एकदा लांबला आहे. विधान परिषद निवडणूक आणि पक्षांतर बंदी कायद्यामुळे या दोन्ही नेत्यांचा प्रवेश लांबला आहे. (MIM Taufiq shaikh)

शिवसेनेचे महेश कोठे आणि एमआयएमचे तौफिक शेख यांचा राष्ट्रवादी प्रवेश लांबला; वाचा कारण काय?
Taufiq shaikh
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 9:16 AM

सोलापूर: शिवसेनेचे नेते महेश कोठे आणि एमआयएमचे नेते तौफिक शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश पुन्हा एकदा लांबला आहे. विधान परिषद निवडणूक आणि पक्षांतर बंदी कायद्यामुळे या दोन्ही नेत्यांचा प्रवेश लांबला आहे. गेल्या वर्षभरापासून हे दोन्ही नेते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या जोरदार चर्चा आहेत. हे दोन्ही नेते राष्ट्रवादीत आल्यास सोलापूरमधील राजकारण ढवळून निघणार असल्याचं सांगितलं जात आहे. (mim leader Taufiq shaikh and Mahesh kote will not join ncp right now)

शिवसेनेचे महेश कोठे आणि एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांचा राष्ट्रवादीतील पक्षप्रवेश पुन्हा एकदा लांबणीवर गेला आहे. विधान परिषद निवडणुका आणि पक्षांतर बंदी कायद्यामुळे हा पक्षप्रवेश लांबला आहे. मात्र, शेख यांचे चिरंजीव अदनाद शेख यांच्यासह एमआयएमच्या काही नगरसेवकांचे नातेवाईक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. सांकेतिक स्वरुपात हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. तौफिक शेख हे सोलापुरातील बडे नेते असून त्यांचं मुस्लिम समाजात प्राबल्य आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात एमआयएमकडून निवडणूक लढवली होती.

आरोपामुळे निवडणूक लढवली नाही

शेख यांना कर्नाटकातील काँग्रेस नेत्या रेश्मा पडकनूर यांच्या खुनाच्या आरोपाखाली त्यांना तुरुंगात जावे लागले होते. त्यामुळे त्यांना यंदाची विधानसभा निवडणूक लढविता आली नाही. त्यांना तुरुंगातूनच शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून एमआयएमकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे होते. मात्र ऐनवेळी पक्षाने फारुक शादी यांना निवडणूक रिंगणात उतरवले गेले.

कोठेंची बंडखोरी

महेश कोठे हे सध्या शिवसेनेत असून काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांचे निष्ठावंत असलेले स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांचे ते चिरंजीव आहेत. कोठे यांनी 2014 मध्ये काँग्रेसला रामराम करत सोलापुरातील शहर मध्य मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. तर 2019 मध्ये शिवसेनेने तिकीट नाकारल्याने शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करत शहर मध्य मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती.

कोण आहेत महेश कोठे?

महेश कोठे सध्या सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक आहेत आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक सुशीलकुमार शिंदे यांचे निष्ठावंत असलेल्या विष्णुपंत कोठे यांचे चिरंजीव 2014 मध्ये काँग्रेसला रामराम करत प्रणिती शिंदे यांच्याविरोधात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली. 2019 ला शिवसेनेने तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरी करत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. महेश कोठे यांना 21 नगरसेवकांपैकी शिवसेनेच्या 19 नगरसेवकांचा पाठिंबा महेश कोठे यांचा राष्ट्रवादीत पक्षाचा प्रवेश झाला, तर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार

कोण आहेत तौफीक शेख?

तौफीक शेख हे एमआयएमचे नगरसेवक आहेत. तौफीक शेख हे महेश कोठेंचे समर्थक आहे. कोठेंनी काँग्रेस सोडल्यावर तौफिक यांनी एमआयएमची वाट धरली काँग्रेसला रामराम करत एमआयएम कडून 2014 साली शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आमदार प्रणिती शिंदे आणि तौफिक यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात मुस्लिम बहुल असल्याने शेख यांना मानणारा वर्ग मोठा एमआयएमचे सध्या सोलापुरात 8 नगरसेवक (mim leader Taufiq shaikh and Mahesh kote will not join ncp right now)

संबंधित बातम्या:

राष्ट्रवादीच्या वाटेवर असणाऱ्या एमआयएमच्या तौफिक शेख यांचं नगरसेवक पद रद्द

राज ठाकरे आणि चंद्रकांतदादा एकमेकांना भेटण्याची शक्यता; दोन्ही नेते शासकीय विश्रामगृहात

मनसेसोबत युती होणार का?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…

(mim leader Taufiq shaikh and Mahesh kote will not join ncp right now)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.