कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे व्यवसाय सुरु करण्याला परवानगी द्या, राज्यमंत्री यड्रावकरांची अजितदादांकडे मागणी

कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यासंदर्भात राज्यमंत्री यड्रावकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. | Rajendra Yadravkar meet Ajit Pawar

कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे व्यवसाय सुरु करण्याला परवानगी द्या, राज्यमंत्री यड्रावकरांची अजितदादांकडे मागणी
राज्यमंत्री यड्रावकरांनी घेतली अजितदादांची भेट
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 3:01 PM

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यासंदर्भात राज्यमंत्री यड्रावकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. यावेळी कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात असलेल्या गावातील व्यावसायिकांना पुन्हा व्यवसाय सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी यड्रावर यांनी केली.  (Minister Rajendra patil yadravkar Meet DCM Ajit pawar Demand Allow traders from Kolhapur district to start business)

कोल्हापूर शहराच्या धर्तीवर जिल्ह्यामध्ये बाधित रुग्णांची संख्या ज्या शहर व गावांमध्ये कमी आहे, अशा ठिकाणच्या व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी यासाठी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची बुधवारी सकाळी भेट घेतली.

व्यापाऱ्यांच्या समस्या अजितदादांच्या कानावर

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची विस्तृत माहिती देताना, व्यापारी वर्गासमोर व्यवसाय बंद असल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी देखील मांडल्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व शहरांमधील तसेच ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय सातत्याने बंद राहत असल्यामुळे सर्व व्यापारी वर्ग अडचणीतून मार्गक्रमण करीत असल्याचं राज्यमंत्री यड्रावकर यांनी उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं.

लवकरच व्यवसाय सुरु होतील, अजितदादांचा शब्द

संबंधित व्यापाऱ्यांचे व्यवसाय शासनाच्या अटी व शर्तीसह सुरू करण्यासाठी आपण प्रशासनाला आदेश द्यावेत अशी विनंतीही केली. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं सांगताना राज्यमंत्री यड्रावकर यांनी उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना व्यापाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात तातडीने आदेश दिले आहेत. तसंच रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण ज्या ठिकाणी कमी असेल अशा जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाकडून लवकरच आदेश पारित होतील, असंही शेवटी यड्रावकरांनी सांगितलं.

(Minister Rajendra patil yadravkar Meet DCM Ajit pawar Demand Allow traders from Kolhapur district to start business)

हे ही वाचा :

भारती पवार यांचा मोदी टीममध्ये समावेश होणार?; पवार यांच्या नावाची दिल्लीत जोरदार चर्चा

Modi Cabinet Expansion: रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रेंचा राजीनामा?; दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...