Nitin Deshmukh : आमदार नितीन देशमुखांनी महावितरणच्या अधिकाऱ्याला झापले, नेमकं काय घडलं?
या कार्यालयातील अधीक्षक अभियंता पवनकुमार कचोट यांच्या कार्यालयात धडक दिला. अधिकाऱ्याला जाब विचारला. अधिकाऱ्यांना हे काम लवकरच करण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला.
अकोला : गेल्या वीस-पंचवीस दिवसांपासून बाळापूर तालुक्यातल्या आगर आणि उगवा या भागात विजेचा लपंडाव (Electricity Lapandav) सुरू आहे. 25 गावांतील लाईटचा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे. दिवसभर आणि रात्रभर लाईट नसते. लाईट असली तर एखादा तास असते. त्यामुळे नागरिक या महावितरणच्या (Mahavitaran) भोंगळ कारभारामुळे त्रस्त झालेले आहेत. शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर (Gopal Datkar) आणि गावकऱ्यांनी आज महावितरणचे कार्यालय गाठले.
शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा
या कार्यालयातील अधीक्षक अभियंता पवनकुमार कचोट यांच्या कार्यालयात धडक दिला. अधिकाऱ्याला जाब विचारला. अधिकाऱ्यांना हे काम लवकरच करण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला. दोन दिवसांत त्यांनी जर डीपी वरची आणि लोडशेडिंगची कामे पूर्ण नाही केली तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी दिला.
परिसरात वाराधुंद येते. त्यामुळं विजेचा लपंडाव सुरू आहे.कधी पावसाचा जोर तर कधी वाऱ्याचा. यामुळं वीज केव्हा जाईल, याचा काही नेम नाही. त्यामुळं आगर आणि उगवा या परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.
25 गावांतील विजेचा प्रश्न काय
वीज केव्हा येईल, केव्हा जाईल, याचा काही नेम नाही. सुमारे 25 गावांतील विजेचा प्रश्न आहे. हे सारं असताना महावितरणचे अधिकारी करतात काय, असा प्रश्न निर्माण होतो. याच मुद्दयावर परिसरातील लोकप्रतिनिधी एकत्र आले. त्यांनी आमदार नितीन देशमुख यांना हा प्रश्न किती गंभीर आहे, याची जाणीव करून दिली.
त्यानंतर आमदार नितीन देशमुख कार्यकर्त्यांसह महावितरणच्या कार्यालयासमोर धडकले. अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दोन दिवसांत वीज सुरळीत झाली पाहिजे, असा दम दिला.