काय डोंगर, काय झाडी, काय हाटील फेम शहाजी बापू पाटील म्हणतात; आता मी अमिताभ बच्चनसारखा…

शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील हे बंगळुरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात गेले होते. या ठिकाणी ते 12 दिवस राहिले. या 12 दिवसात त्यांनी त्यांचं वजन कमी केलं. आपलं वजन कसं कमी केलं याचं रहस्य त्यांनी सांगितलं.

काय डोंगर, काय झाडी, काय हाटील फेम शहाजी बापू पाटील म्हणतात; आता मी अमिताभ बच्चनसारखा...
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 8:52 AM

सोलापूर : वजन वाढल्यामुळे चालता येत नव्हतं. एसटीत चढता येत नव्हतं. घरचा जीना चढताना मला त्रास व्हायचा. त्यामुळे नागपूरच्या अधिवेशनाला दांडी मारून मी बंगळुरूला गेलो. आणि सटासट 12 किलो वजन कमी करूनच माघारी आलो. आता मी अमिताभ बच्चनसारखा चालतो. बायकोपण म्हणाली बंगळुरूला जाऊन एवढं कमी केलं. मी स्वत:वर प्रेम करून आयुर्वेदीक काढा पिऊन पिऊन चरबी सगळी काढून टाकली आहे, असं काय झाडी, काय डोंगर, काय हाटील फेम शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं.

आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यातील महाआरोग्य शिबिरात आमदार शहाजी पाटलांनी धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी आपलं वजन कमी होण्याचं रहस्य सांगितलं. वयामुळे जीने चढता येत नाही. बसता येत नाही. एसटीत चढता येत नाही. नागपूर अधिवेशन सुरू असतानाच एक दिवस विचार केला. शरीराचं काय करायचं? उपचार करायला हवा असं ठरवलं. अधिवेशनाला आठ दिवस उरलेले असतानाच मी बंगळुरूला गेलो. श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात थांबलो. 12 दिवस मी मसाज केला. वनस्पतींचे काढे घेतले. रात्रभर काढा पिऊन सटासट 12 किलो वजन कमी केलं, असं शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

तर मुश्रीफ सुटतील

गेली चार पाच महिने सत्तासंघर्षावर कोर्टात सुनावण्या सुरू आहे. कायद्याची बाजू आणि पुरावे पाहिल्यावर आमच्याच बाजूने निकाल लागेल असं आम्हाला वाटतं. दोन तीन दिवस तरी अजून निकालाला येतील, असं त्यांनी सांगितलं. हसन मुश्रीफ यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची दोन वर्षापासून चर्चा सुरू आहे. ईडीने त्यांना नोटीस दिली. मुश्रीफ यांनी पुरावे दिली. तर ते सुटतील. नाही दिले तर ईडी त्यांच्या नियमाने कारवाई करेल, असं त्यांनी सांगितलं.

राऊतांना किंमत चुकवावी लागेल

शीतल म्हात्रे यांच्या प्रकरणात मुका घ्या मुका अशी शेरेबाजी करून संजय राऊत यांनी महिला वर्गाचा अपमान केला आहे. राऊत यांच्या या विधानाचा आम्ही निषेध करतो. त्याची किंमत संजय राऊत यांना चुकवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. संजय राऊत ऊर्फ आगलावे यांचे मागील तीन वर्षापासूनचे विधान पाहिले तर उद्धव ठाकरे यांना राजकारणातून संपवण्याची त्यांनी सुपारीच घेतल्यासारखे वाटते, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.