विदर्भात मनसेला मोठा धक्का; मनसेचा नेता उद्या भाजपात प्रवेश करणार

महत्त्वाचं म्हणजे प्रवेशाच्या आधीच त्यांना भाजपच्या वतीने विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी हा मोठा धक्का समजला जातो.

विदर्भात मनसेला मोठा धक्का; मनसेचा नेता उद्या भाजपात प्रवेश करणार
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 6:51 PM

निलेश डाहाट, प्रतिनिधी, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. रमेश राजूरकर हे उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश करणार आहेत. वरोरा विधानसभा क्षेत्रात मनसेच्या तिकिटावर 2019 ची निवडणूक राजूरकर लढले होते. महत्त्वाचं म्हणजे प्रवेशाच्या आधीच त्यांना भाजपच्या वतीने विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी हा मोठा धक्का समजला जातो.

उद्या जैन मंदिर सभागृहात कार्यक्रम

25 जून रोजी रमेश राजूरकर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे. प्रवेशाच्या मोठ्या सोहळ्याचे आयोजन भद्रावती येथील जैन मंदिर सभागृहामध्ये करण्यात आले आहे. सप्टेंबर 2022 मध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तेव्हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रमेश राजूरकर यांच्या वरोरा येथील निवासस्थानी भेट दिली होती. रमेश राजूरकर हे मनसेचे मोठे शिलेदार समजले जात होते. आता तेचं भाजपात गेल्याने चंद्रपुरातील मनसे नावापुरते राहणार असल्याचे चित्र आहे.

भाजपाचा नवा डाव

काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. हे चित्र लक्षात घेता भाजपने नवा डाव टाकल्याचे चित्र दिसत आहे. याच क्षेत्रातून दिवंगत खासदार यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर आमदार आहेत. मागील निवडणुकीत रमेश राजूरकर यांनी तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. राजूरकर यांना पक्षात खेचून भाजपने प्रत्येक विधानसभा जिंकण्यासाठी आक्रमक रणनीती आखल्याचे स्पष्ट केले आहे.

भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. शिंदे गटातही इनकमिंग सुरू आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांचे जाळे मजबूत होत असल्याचे चित्र आहे. येत्या निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.