Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यवतमाळमध्ये तब्बल 200 पेक्षा जास्त विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

पुणे आणि नाशिक पाठोपाठ आता विदर्भातंही मनसे आपली ताकद वाढवायला लागलीय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने विदर्भातील मनसे नेते पक्षातील इनकमिंगवर जास्त भर देतातय.

यवतमाळमध्ये तब्बल 200 पेक्षा जास्त विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 12:30 AM

यवतमाळ : पुणे आणि नाशिक पाठोपाठ आता विदर्भातंही मनसे आपली ताकद वाढवायला लागलीय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने विदर्भातील मनसे नेते पक्षातील इनकमिंगवर जास्त भर देतातय. यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा क्षेत्रात, मनसे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे.

विशेष म्हणजे मनसेने वणी, मारेगाव तालुक्यात पक्षप्रवेश मेळावेच घेतले आहे. यात आतापर्यंत 200 पेक्षा जास्त विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्याची माहिती आहे. तसेच आणखी अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मनसेत प्रवेश करण्यास इच्छूक आहेत, अशी माहिती मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिली आहे.

राज ठाकरे पुण्यात रस्त्यावर उतरणार

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात मोर्चेबांधणी करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता थेट पुण्यातच आंदोलन करणार आहेत. तळजाई टेकडीवरील प्रकल्पाला विरोध करण्यासाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वात 24 ऑक्टोबर रोजी पुण्यात मोठं आंदोलन होणार असून त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी या आंदोलनाची माहिती दिली. तळजाई टेकडीवर प्रकल्प होत असून या टेकडीवर एक प्रकारचं अतिक्रमणच केलं जाणार आहे. त्याला आमचा विरोध आहे. त्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात येत्या 24 तारखेला हे आंदोलन होणार आहे. सकाळी 7 वाजताच या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं.

भाजपबरोबरच्या युतीवर चर्चा नाही

दरम्यान, काल राज ठाकरे पुण्यात होते. काल त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून विविध मतदारसंघांचा आढावा घेतला. तसेच कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने काही सूचनाही केल्या. राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात पुण्यात भाजपबरोबर युती करण्याची कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, आम्ही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या वर्षी पुण्याचा महापौर मनसे ठरवणार आहे, असंही मोरे यांनी सांगितलं.

राज ठाकरेंच्या जोरबैठका

राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवार सायंकाळी 5 वाजता पुणे शहरातील सर्व शाखा अध्यक्ष यांना नेमणूक पत्र वितरण देण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता शहर पदाधिकारी बैठक झाली. यावेळी 9 शहर संघटक, 6 शहर सचिव, 9 विभाग सचिव बैठकीला उपस्थित होते. यानंतर सायंकाळी 6.30 वाजता 3 राज्य उपाध्यक्ष, 4 राज्य सरचिटणीस, 1 कार्यालयीन प्रमुख, 1 प्रसार माध्यम प्रमुख, 1 राज्य सचिव प्रवक्ता यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. शनिवारी 9 सप्टेंबर रोजी पीवायसी जिमखाना भांडारकर रोड बाल शिक्षण मंदिर समोर सकाळी 10 वाजता 10 उपशहर अध्यक्ष, 8 विभाग अध्यक्ष यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यानंतर सकाळी 11 वाजता 18 आजी माजी नगरसेवकांसोबत बैठक झाली.

हेही वाचा : ‘तात्यासाहेबां’चे भव्य पोस्टर, पुणे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरेंच्या वाढदिवसाला कोरोना नियमांना हरताळ

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास.
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.