निलेश डाहाट, प्रतिनिधी, चंद्रपूर : ईडी म्हणजे अंमलबजावणी संचालनालय. ईडीचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधक करत असतात. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची ईडी चौकशी झाली. राजू शेट्टी म्हणाले, ईडी चौकशी सगळ्यांची करत असाल तर मीही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. ईडी म्हटलं की, विरोधक सरकारच्या हातातील बाहुलं समजतात. त्यामुळे आता काँग्रेसच्या नेत्यांविरोधात किंवा विरोधातील नेत्यांविरोधात ईडी चौकशी झाल्यास ईडीकडेचं संशयाने पाहिलं जातं.
चंद्रपुरातून काँग्रेसकडून बाळू धानोरकर हे निवडून आले. त्यांच्या पत्नी प्रतीभा धानोरकर या आमदार आहेत. पती खासदार आणि पत्नी आमदार अशी धोनारकर दाम्पत्याची हिस्ट्री आहे. त्यात बाळू धानोकर यांचा साळा म्हणजेच आमदार प्रतीभा धानोकर यांचा भाऊ सध्या ईडीच्या रडारवर आला आहे. बाळू धानोकर हे व्यावसायिक आहेत. त्यांचे बरेच व्यवसाय आहेत.
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचा साळा ईडीच्या रडारवर आलाय. प्रवीण काकडे असं या साळ्याचं नाव आहे. खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांचा प्रवीण सख्खा भाऊ आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकात प्रवीण काकडे विरोधात काही काही गुन्हे दाखल आहेत का याबाबत ईडीने चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे विचारणा केली आहे. सोबतच जिल्ह्यात चौकशीसाठी येणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
ईडीच्या नागपूर कार्यालयाने यासंदर्भात पोलीस अधीक्षकांना पत्र पाठविले आहे. राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या निकटवर्तीयांवर ईडीची वक्रदृष्टी वळल्याने जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडण्याची शक्यता वर्तविली जाते.