‘गिरीश कुबेरांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही’, वादग्रस्त पुस्तकावरुन संभाजी छत्रपती संतप्त

पत्रकार गिरीश कुबेर यांच्या पुस्तकातील वादग्रस्त विधानावरुन खासदार संभाजी छत्रपती संतप्त झालेत. सरकारने तात्काळ या पुस्तकावर देशात आणि राज्यात बंदी घालावी, अशी मागणी खासदार संभाजी छत्रपती यांनी केली.

'गिरीश कुबेरांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही', वादग्रस्त पुस्तकावरुन संभाजी छत्रपती संतप्त
Sambhaji Chhatrapati
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 4:43 PM

नांदेड : पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातील (Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra) वादग्रस्त विधानावरुन खासदार संभाजी छत्रपती संतप्त झालेत. सरकारने तात्काळ या पुस्तकावर देशात आणि राज्यात बंदी घालावी, अशी मागणी खासदार संभाजी छत्रपती यांनी केली. ते नांदेडमध्ये मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते. असे लिखाण आपण खपवून कसे घेतो? सरकारने आजपर्यंत पुस्तकावर बंदी का आणली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच पुस्तक लिहिणाऱ्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा संभाजी छत्रपतींनी दिला (MP Sambhaji Chhatrapati warn Journalist Girish Kuber over controversial claim in book).

“ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्यावं”

“मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी काही मराठा संघटनांची मागणी आहे, पण तो तांत्रिक विषय असून सरकार निर्णय घेईन. ओबीसीला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावं, असं माझं वैयक्तीक मत आहे,” असं ख़ासदार संभाजी छत्रपती म्हणाले.

“विनायक मेटे यांची स्टाईल वेगळी, माझी वेगळी”

विनायक मेटे 5 जूनपासूनच्या आंदोलन करणार आहेत. यावरही खासदार संभाजी छत्रपती यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “विनायक मेटे हे मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत. त्यांची स्टाईल वेगळी आहे, माझी वेगळी आहे.”

“सत्ताधारी आणि विरोधक मार्ग काढण्याऐवजी टिका करण्यात व्यस्त”

“सत्ताधारी आणि विरोधक हे मराठा आरक्षणासाठी मार्ग काढण्याऐवजी एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त आहेत. सर्वोच्च न्यायालयात अनेक्झरचे इंग्रजी रूपांतर करण्यासाठी एकदा नाही, तर दहादा अशोक चव्हाणांना सांगितले. पण तसं झालं नाही,” असं सांगत खासदार संभाजींनी अशोक चव्हाणांवर टीका केली.

नेमकं प्रकरण काय?

गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावर संभाजी ब्रिगेड संघटनेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, भाजप आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी आक्षेप घेतलाय. यात लेखकाने छत्रपती संभाजीराजे यांच्यावर हत्येचा आरोप करुन त्यांची बदनामी केल्याचं या संघटना आणि पक्षांचं म्हणणं आहे. यासाठी लेखक कुबेरांनी महाराष्ट्राची माफी मागवी आणि राज्य सरकारने तातडीने या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा :

पत्रकार गिरीश कुबेरांच्या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर, राष्ट्रवादी, भाजप, संभाजी ब्रिगेड आक्रमक, बंदीची मागणी

पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण राज्याचा विषय, त्यामुळे संभाजीराजेंना भेटले नाहीत: चंद्रकांत पाटील

आरक्षणाचे जनक शाहूंचा आशीर्वाद घेऊन संभाजीराजे मोहिमेवर, मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा सुरु

व्हिडीओ पाहा :

MP Sambhaji Chhatrapati warn Journalist Girish Kuber over controversial claim in book

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.