मुरबाडमध्ये शेतात सापडलं धान्याचं भूमिगत कोठार, जुन्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीचा नमुना!
घाटावर धान्य साठवण्यासाठी जशी भूमिगत कोठारं असतात, तशा पद्धतीचं एक भूमिगत धान्य कोठार मुरबाड तालुक्यातील भांगवाडीतील एका शेतात सापडलंय. (Murbad In farm undergound Granary)

मुरबाड : घाटावर धान्य साठवण्यासाठी जशी भूमिगत कोठारं असतात, तशा पद्धतीचं एक भूमिगत धान्य कोठार मुरबाड तालुक्यातील भांगवाडीतील एका शेतात सापडलंय. जुन्या काळातील या कोठाराच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीनं जाणकारांचं लक्ष वेधून घेतलंय. मुरबाडच्या भांगवाडीतील जयवंत लोभी या आदिवासी शेतकऱ्याच्या शेत जमिनीत हे कोठार आढळलं. (Murbad In farm undergound Granary)
स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना
मुरबाडच्या भांगवाडीतील आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात सात फुट खोल आणि चार फुट रूंदीचं हे भूमिगत गोदाम आहे. धान्य साठवण्याच्या या भूमिगत गोदामांना ‘पेव’ म्हटले जाते. कोकणात अधिक पाऊस पडत असल्याने पेवऐवजी धान्य साठविण्यासाठी बांबूच्या कणग्या वापरल्या जातात. त्यामुळे मुरबाडच्या शेत जमिनीत सापडलेल्या या गोदामाविषयी आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
तहसीलदारांकडून पाहणी
मुरबाडचे तहसीलदार अमोल कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन या भुमिगत गोदामाची पाहणी केली. या गोदामाची छायाचित्रं आणि मोजमापं घेऊन पुरातत्त्व विभागाला कळविण्यात आलंय.
अशी गोदामं का बांधली जायची?
सर्वसाधारणपणे धान्याचं कोठार घरात किंवा अंगणात असतं. मात्र मुरबाडमध्ये सापडलेलं हे भूमिगत गोदाम चक्क शेतात आहे. या गोदामाची बांधणी अजूनही पक्की असून त्यावरूनच स्थानिकांना जुन्या काळात असलेल्या कौशल्याची प्रचिती येते. जुन्या काळात सरंजामी पद्धतीत जमीनदार मंडळी शेतकऱ्यांचं शोषण करीत असत. त्यांच्यासाठी तुटपुंजे धान्य ठेवून बाकी सर्व शेतमाल बैलगाडीतून भरून घेऊन जात असत. त्यामुळे जमीनदार अथवा त्याच्या माणसांच्या लक्षात येणार नाही, अशी शेतातच धान्य लपविण्याची ही व्यवस्था असावी, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
(Murbad In farm undergound Granary)
ही हे वाचा :
नवी मुंबई पालिकेच्या थकबाकी धारकांना नोटिसा, 21 दिवसांच्या आत कर भरा अन्यथा मालमत्ता विक्री करणार!
VIDEO | मुंबई एक्सप्रेस फ्री वेवर माशांनी भरलेला टेम्पो उलटला, मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी