Osmanabad Crime: उस्मानाबादमध्ये क्राईम पेट्रोल पाहून चिमुरड्याची हत्या; नेमकी का केली हत्या? वाचा सविस्तर

हत्या केल्यानंतर अल्पवयीन आरोपीला किती शिक्षा होते याची माहितीही आरोपीने रात्रभर इंटरनेटवर तपासली. सदर अल्पवयीन आरोपीला क्राईम पेट्रोल सिरियल पाहण्याचे व्यसन होते. क्राईम पेट्रोल पाहूनच त्याने हा गुन्हा केल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे.

Osmanabad Crime: उस्मानाबादमध्ये क्राईम पेट्रोल पाहून चिमुरड्याची हत्या; नेमकी का केली हत्या? वाचा सविस्तर
मिठाईच्या दुकानातील उकळत्या पाण्यात पडली चिमुकली
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 10:56 PM

उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथील 5 वर्षीय बालकाच्या खूनाचे रहस्य अवघ्या काही तासात उलगडण्यात उस्मानाबाद पोलिसांना यश आले आहे. चिडविल्याने राग आल्याने गावातील एका अल्पवयीन मुलाने दोरीने गळा दाबून क्राईम पेट्रोल पाहून खून केला असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपीने इंटरनेटवर अल्पवयीन आरोपीला 302 कलम अंतर्गत किती शिक्षा होते यासह कायदेशीर प्रक्रियेची माहिती घेल्याचे समोर आले आहे.

चिडवल्याच्या रागातून अल्पवयीन आरोपीनेच केली हत्या

अल्पवयीन आरोपी हा अकरावीत विज्ञान शाखेत शिकत आहे. आरोपीला गावात सर्व जण एका टोपण नावाने चिडवायचे. त्यामुळे मयत 5 वर्षाच्या बालकानेही त्याला त्याच नावाने हाक मारली. यामुळे आरोपी चिडला आणि त्याने सदर बालकाच्या जोरदार कानशिलात लगावली. यामुळे तो बालक बेशुद्ध झाला. त्यानंतर आरोपीने त्याला आपल्या घरी नेले आणि नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळला. बालकाला ठार मारल्यानंतर त्याच्या कानतील बाली काढून आरोपीने आपल्या बूटमध्ये लपवली. त्यानंतर मृतदेहावर गादी आणि इतर सामान टाकून तो शेजारी राहत असलेल्या चुलत्याच्या घरी नेऊन टाकला.

क्राईम पेट्रोल पाहून हत्या केल्याचा खुलासा

हत्या केल्यानंतर अल्पवयीन आरोपीला किती शिक्षा होते याची माहितीही आरोपीने रात्रभर इंटरनेटवर तपासली. सदर अल्पवयीन आरोपीला क्राईम पेट्रोल सिरियल पाहण्याचे व्यसन होते. क्राईम पेट्रोल पाहूनच त्याने हा गुन्हा केल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. शिक्षेची माहिती मिळवल्यानंतर आरोपीने स्वतः सकाळी वडिलांना दारात हात दिसले असे सांगितले. त्यानंतर या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला. यानंतर पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर कसून तपास केला असता हत्येचे रहस्य उलगडण्यास पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे,आजीनाथ काशीद यांच्या पथकाने ही कामगिरी केली. (Murder by a minor accused after seeing crime patrol in Osmanabad)

इतर बातम्या

Fake Loan Apps : काही सेकंदात रिकामं होऊ शकतं अकाऊंट, चुकूनही डाऊनलोड करू नका अनोळखी अॅप्स

Bihar Crime: हुंड्यासाठी पत्नी आणि मुलांची विष पाजून हत्या, बिहारमधील अमानुष घटनेने सर्वत्र खळबळ

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.