Sangli Murder : सांगलीत जेवणावरुन झालेल्या वादातून मुलाकडून आईची हत्या

सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे आरोपी दशरथ जाधव आणि त्याची आई मयत राजाका जाधव राहत होते. दशरथ जाधव याला दारुचे व्यसन आहे. दारुच्या नशेत दशरथ नेहमीच आपल्या वृद्ध आईला मारहाण करत असे. गुरुवारी 5 मे रोजीही जेवण देण्याच्या कारणावरुन दशरथने आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. आईच्या डोक्यात दगड, वीट आणि लोखंडी फुकारी घालून आरोपीने राजाका यांना जबर मारहाण केली.

Sangli Murder : सांगलीत जेवणावरुन झालेल्या वादातून मुलाकडून आईची हत्या
सांगलीत जेवणावरुन झालेल्या वादातून मुलाकडून आईची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 5:11 PM

सांगली : जेवणावरुन झालेल्या वादातून मुलाने आई (Mother)ची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना सांगलीत उघडकीस आली आहे. डोक्यामध्ये दगड, वीट आणि लोखंडी फुकारी घालून मुलाने आईला ठार केले. राजाका ज्ञानू जाधव (70) असे हत्या करण्यात आलेल्या आईचे नाव आहे तर दशरथ ज्ञानू जाधव असे हत्या करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेचा नातू गणेश भोसले याच्या फिर्यादीवरुन कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस करत आहेत. (Murder of a mother by a child in a dispute over a meal in Sangli)

डोक्यात दगड, वीट घालून आईची हत्या

सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे आरोपी दशरथ जाधव आणि त्याची आई मयत राजाका जाधव राहत होते. दशरथ जाधव याला दारुचे व्यसन आहे. दारुच्या नशेत दशरथ नेहमीच आपल्या वृद्ध आईला मारहाण करत असे. गुरुवारी 5 मे रोजीही जेवण देण्याच्या कारणावरुन दशरथने आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. आईच्या डोक्यात दगड, वीट आणि लोखंडी फुकारी घालून आरोपीने राजाका यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत राजाका गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मयत राजाका यांचा नातू गणेश भोसले याने कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. (Murder of a mother by a child in a dispute over a meal in Sangli)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.