Jalgaon Murder : जळगावमध्ये दगडाने ठेचून एकाची हत्या, गेल्या पंधरवड्यातील चौथी घटना
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत. मात्र जळगाव शहरात लागोपाठ झालेल्या हत्याकांडामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
जळगाव : दगडाने ठेचून एका व्यक्तीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना जळगावमधील मेहरुण तलावाजवळ आज दुपारी घडली आहे. या व्यक्तीचे वय साधारणपणे पन्नासच्या आसपास आहे. दिनेश भिकन पाटील वय असे मयताचे नाव आहे. गेल्या 15 दिवसातील हत्येची ही चौथी घटना आहे. दगडाने ठेचून मृतदेहाचा चेहरा बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस (MIDC Police) पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत. मात्र जळगाव शहरात लागोपाठ झालेल्या हत्याकांडामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या व्यक्तीची हत्या कुणी आणि का केली ? याचा पोलिस तपास करीत आहेत. (Murder of a person in Jalgaon for unknown reasons is the fourth incident in the last 15 days)
याआधीही दोन तरुणांच्या हत्या उघडकीस
शहरातील समता नगर येथे एका तरुणाची हत्या झाली होती. सागर पवार असे तरुणाचे नाव आहे. या घटनेला 24 तास पूर्ण होत नाही तोवर आज जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको येथे प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या 28 वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना घडल्याने जळगाव शहर पुन्हा हादरले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नरेश आनंदा सोनवणे हा तरुण शहरातील फेडरेशन येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास होता. तो रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याचे शिवाजी नगर हुडको येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. तो प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या शिवाजी नगर येथील घरी गेला असता, यावेळी त्याच्यावर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले होते. परिसरातील नागरिकांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. (Murder of a person in Jalgaon for unknown reasons is the fourth incident in the last 15 days)
इतर बातम्या
Aurangabad | एकतर्फी प्रेमातून मित्राची हत्या, औरंगाबादेत आरोपीला जन्मठेप, 50 हजारांचा दंड
Vadodara: गुजराती ड्रामा अर्टिस्ट प्राची मौर्य हत्या प्रकरणी बॉयफ्रेंडला जन्मठेपेची शिक्षा