ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट आला, शिवशाही स्कूल बसला धडकली !

शिर्डीहून पुण्याला चाललेली शिवशाही बस पुढील वाहनाला ओव्हरटेक करत होती. मात्र ओव्हरटेक करणे चांगलेच माहगात पडले आहे. दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला.

ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट आला, शिवशाही स्कूल बसला धडकली !
शिवशाहीची स्कूल बसला धडकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 3:37 PM

शिर्डी / मनोज गाडेकर : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस स्कूल बसला धडकल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात घडली. या अपघातात चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोणी बाभळेश्वर रोडवर छत्रपती चौकात आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताचा तपास सुरु असून, तपासानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल.

ओव्हरटेकच्या नादात स्कूल बसला धडकली शिवशाही

शिर्डीहून पुण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसने रस्ता ओलांडत असलेल्या लिटील फ्लॉवर स्कुलच्या बसला जोराची धडक दिली. शिवशाही बस दुसर्‍या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात स्कूल बसवर जाऊन धडकली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे. दोषींविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.

बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचे चालकाचे म्हणणे

हा अपघात शिवशाही बसचा चालक खंदारे याच्याकडून झाला. चालक खंदारे याने अपघातचे कारण बसचे ब्रेक फेल झाल्याचे संगितले. मात्र ओव्हरटेक करण्याच्या नादात शिवशाही बसकडून अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. सदर अपघाताचा लोणी पोलीस तपास करत आहेत. तपासाअंती अपघाताचे कारण उघड होईल.

हे सुद्धा वाचा

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.