Nanded महापालिका निवडणुकीच्या हालचाली, यंदा प्रथमच आरक्षणाशिवाय प्रभाग रचना, किती नगरसेवक वाढणार?

नांदेड मनपा हद्दीतील प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करून 28 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार आहे. आयोगाना प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर या प्रारुप रचनेवर हरकत व सूचना मागवल्या जाणार आहेत.

Nanded महापालिका निवडणुकीच्या हालचाली, यंदा प्रथमच आरक्षणाशिवाय प्रभाग रचना, किती नगरसेवक वाढणार?
नांदेड महापालिकेत निवडणुकीच्या हालचालींना वेग
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 4:39 PM

नांदेड: कोरोना महामारी आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे नांदेड महापालिका निवडणुकांवरही (Nanded Municipal Election) अनिश्चिततेचं सावट घोंगावत होतं. मात्र आता महापालिकेच्या निवडणुकीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) महापालिकेच्या प्रभाग रचनेचे (Ward Formation) आदेश आल्यानंतर आता गोपनीय पद्धतीने प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्याचे काम सुरु झाले आहे. नांदेड महापालिकेची मुदत 30 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे आगामी सप्टेंबर महिन्यात येथील महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार, येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत नांदेड महापालिकेला प्रभाग रचनेचा आराखडा आयोगाकडे पाठवायचा आहे. त्यासाठी महापालिका कामाला लागली आहे.

2011 च्या जनगणेनेत नैसर्गिक वाढ गृहित धरणार

कोरोना महामारीमुळे 2021 सालची जनगणना होऊ शकली नाही. त्यामुळे 2011 सालच्या जनगणेनुसार शहराची 5 लाख 50 हजार 439 लोकसंख्या गृहित धरून प्रभाग रचना केली जात आहे. त्यानुसार, तीन नगरेवकांचे 30 प्रभाग आणि दोन नगरसेवकांचा एक प्रभाग करण्यात येणार आहे. सध्या नांदेड मनपात 81 नगरसेवक असून मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, लोकसंख्या वाढीमुळे 11 नगरसेवकांची भर पडणार आहे. आता 92 नगरसेवकांची संख्या लक्षात घेता रचनेदरम्यान प्रभागांचे क्षेत्रफळ कमी करण्यात येणार आहे.

यंदा प्रथमच आरक्षणाशिवाय प्रभाग रचना

निवडणूक आयोगाने प्रभाग रचना निश्चित करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथणच आरक्षणाशिवाय प्रभाग रचना होणार असून राजकीय आरक्षणाचा घोळ मिटल्यानंतर सोडत काढण्यात येणार आहे. सद्यस्थितीत महापालिकेत ओबीसी प्रवर्गाचे 22 नगरसेवक असून नवीन प्रभाग रचनेत त्यांची संख्या चारने वाढून 26 वर पोहोचली असती.

28 फेब्रुवारीपर्यंत कच्चा आराखड्याची मुदत

नांदेड मनपा हद्दीतील प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करून 28 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार आहे. आयोगाना प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर या प्रारुप रचनेवर हरकत व सूचना मागवल्या जाणार आहेत. या प्रभागरचनेवर मनपा आयुक्त सुनील लहाने, अप्पर आयुक्त गिरीश कदम, बाबाराव मनोहरे आदी अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत.

नांदेड महापालिकेवर ‘अशोक’ चक्र

2017 मध्ये झालेल्या नांदेड महापालिका निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती. महापालिकेत 81 जागांपैकी 70 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. तत्कालीन निवडणुकीत भाजपने फोडाफोडीचे राजकारण केले होते. त्यामुळे निकालांची उत्कंठा वाढली होती. मात्र भाजपने मांडलेली गणितं चुकली आणि पक्षाला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले होते. दुसरीकडे राष्ट्रवादीने खातंही उघडलं नव्हतं. शिवसेनेने तीन जागा पटकावल्या होत्या. तसेच एमआयएमचेही अस्तित्व 2017 मधील निवडणुकीतून बाद झाले होते. 2021 मध्ये काँग्रेसच्या जयश्री पावडे यांना सव्वा वर्षासाठी महापौर म्हणून नेमण्यात आले. आता या महापालिकेची मुदत येत्या 30 ऑक्टोबर रोजी समाप्त होणार आहे.

इतर बातम्या-

ट्रेनच्या वर वायर का लावण्यात आलेल्या असतात?ट्रेन चालवताना होतो का यांचा काही उपयोग!!…

Kareena Kapoor : ‘माझ्या अफेअरची चर्चा व्हायची तेव्हा मला वाईट वाटायचं’ पण आता…

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.