विवाहित प्रेयसीला भेटायला गेला, तो परतलाच नाही; नेमकं काय घडलं?

१५ ऑगस्टला आधीच नवरा-बायकोचे भांडण झाले होते. यात पतीने आपल्या पत्नीला मारहाणही केली होती. त्यात प्रियकर रात्री तिला भेटायला आला.

विवाहित प्रेयसीला भेटायला गेला, तो परतलाच नाही; नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 4:30 PM

राजीव गिरी, प्रतिनिधी, नांदेड : 15 ऑगस्टची रात्र प्रियकर विवाहित प्रेयसीला भेटायला गेला. तिथं गेल्यानंतर तिच्या पतीने त्याला मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना हदगाव तालुक्यात घडली. ही वेळ होती रात्री साडेदहाची.  युवकाला वाटले तिचा पती झोपी गेला असेल. पण, तो जागा होता. ही बाब तिच्या पतीच्या लक्षात आली. त्याने रागाच्या भरात त्याचा जीव घेतला. बरड शेवाळा शिवारामध्ये १५ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. अरविंद देवराव नरवडे (वय ४१, रा. खरबी) असे मृतक युवकाचे नाव आहे.

पतीने आधी केली पत्नीला मारहाण

हदगाव तालुक्यातील खरबी येथील अरविंद याचे बरड शेवाळा येथील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. महिलेच्या पतीला या संबंधांची कुणकुण लागली होती. त्यातूनच १५ ऑगस्ट रोजी सकाळी पतीने पत्नीला मारहाण केली. महाराणीनंतर पत्नीने तिच्या प्रियकराला मारहाण झाल्याची माहिती दिली.

रात्री प्रेयसीला भेटायला आला तो शेवटचाच

अरविंद नरवडे हा १५ ऑगस्ट रोजी रात्री महिलेच्या घरी आला होता. त्याचवेळी पती आणि इतर दोघांनी अरविंद नरवडे यास जबर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मनाठा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पती आणि इतर दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना, सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे आदींनी घटनास्थळी भेट दिली. हदगाव पोलीस घटनेचा अधिकचा तपास करत आहेत.

मृतक अरविंद याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याची माहिती तिच्या पतीला झाली होती. त्यामुळे त्या दोघा नवरा-बायकोचे भांडण होत असते. १५ ऑगस्टला आधीच नवरा-बायकोचे भांडण झाले होते. यात पतीने आपल्या पत्नीला मारहाणही केली होती. त्यात प्रियकर रात्री तिला भेटायला आला. त्यामुळे संतप्त झालेल्या पतीने त्याला यमसदनी धाडले. या घटनेने खळबळ माजली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.