राजीव गिरी, प्रतिनिधी, नांदेड : 15 ऑगस्टची रात्र प्रियकर विवाहित प्रेयसीला भेटायला गेला. तिथं गेल्यानंतर तिच्या पतीने त्याला मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना हदगाव तालुक्यात घडली. ही वेळ होती रात्री साडेदहाची. युवकाला वाटले तिचा पती झोपी गेला असेल. पण, तो जागा होता. ही बाब तिच्या पतीच्या लक्षात आली. त्याने रागाच्या भरात त्याचा जीव घेतला. बरड शेवाळा शिवारामध्ये १५ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. अरविंद देवराव नरवडे (वय ४१, रा. खरबी) असे मृतक युवकाचे नाव आहे.
हदगाव तालुक्यातील खरबी येथील अरविंद याचे बरड शेवाळा येथील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. महिलेच्या पतीला या संबंधांची कुणकुण लागली होती. त्यातूनच १५ ऑगस्ट रोजी सकाळी पतीने पत्नीला मारहाण केली. महाराणीनंतर पत्नीने तिच्या प्रियकराला मारहाण झाल्याची माहिती दिली.
अरविंद नरवडे हा १५ ऑगस्ट रोजी रात्री महिलेच्या घरी आला होता. त्याचवेळी पती आणि इतर दोघांनी अरविंद नरवडे यास जबर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मनाठा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पती आणि इतर दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना, सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे आदींनी घटनास्थळी भेट दिली. हदगाव पोलीस घटनेचा अधिकचा तपास करत आहेत.
मृतक अरविंद याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याची माहिती तिच्या पतीला झाली होती. त्यामुळे त्या दोघा नवरा-बायकोचे भांडण होत असते. १५ ऑगस्टला आधीच नवरा-बायकोचे भांडण झाले होते. यात पतीने आपल्या पत्नीला मारहाणही केली होती. त्यात प्रियकर रात्री तिला भेटायला आला. त्यामुळे संतप्त झालेल्या पतीने त्याला यमसदनी धाडले. या घटनेने खळबळ माजली आहे.