Nanded | नांदेड शहरात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ!

जोरदार झालेल्या पावसामुळे नांदेडकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्हामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळत होते, परंतू पाऊस काही येत नव्हता. पुढील काही दिवसांमध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.

Nanded | नांदेड शहरात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 2:56 PM

मुंबई : मान्सून (Monsoon) यंदा 4 जूनला राज्यात दाखल होईल, असा अंदाजा हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरला. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पाऊस झाला आहे. आज सकाळी नांदेड शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली. यामुळे हवामान गारेगार झाले. दोन दिवसांपासून राज्यातील (State) काही शहरांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळाला. मात्र, नांदेडकडे पावसाने पाठ फिरवली होती. सकाळी अचानकच वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

नांदेडमध्ये वाऱ्यासह पावसाचे आगमन

जोरदार झालेल्या पावसामुळे नांदेडकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्हामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळत होते, परंतू पाऊस काही येत नव्हता. पुढील काही दिवसांमध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली आणि देगलूर भागामध्ये आंबा आणि इतर फळबागा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आताच्या पावसामुळे शेतकरी सुखावणार आहे. 4 जूनपासून राज्यात मान्सून दाखल होणार असा अंदाजा हवामान खात्याने वर्तवला होती. मात्र, दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्यास सुरूवात झालीये.

हे सुद्धा वाचा

रेनकोट आणि छत्री खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

सकाळच्या वेळी अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची चांगलीच धावपळ झालीये. तसेच आता पावसाला सुरूवात झाल्याने रेनकोट आणि छत्री घेण्यासाठी देखील नागरिकांनी गर्दी केलीये. 15 तारखेपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. यामुळे रेनकोट आणि छत्री खरेदी करण्यावर पालकांनी भर दिलायं. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील शाळा बंदच होत्या. विद्यार्थ्यांचे आॅनलाईन पध्दतीनेच सर्व शिक्षण सुरू होते. मात्र, आता कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले आणि शाळा सुरू झाल्या. सध्या राज्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्याही झपाट्याने वाढताना दिसते आहे.

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.