Nandurbar Accident : भरधाव वाहनानं 3 दुचाकींना चिरडले, दिवाळीत 5 जणांवर काळाचा घाला, अपघाताने गावावर शोककळा

Accident Near Pimpod Village : नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद गावाजवळ भीषण अपघात झाला. अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो वाहनाने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या 3 मोटरसायकलींना चिरडले. ऐन दिवाळीत 5 जणांवर काळाने घाला घातला.

Nandurbar Accident : भरधाव वाहनानं 3 दुचाकींना चिरडले, दिवाळीत 5 जणांवर काळाचा घाला, अपघाताने गावावर शोककळा
नंदुरबार अपघात
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 8:59 AM

राज्यात रस्ते वाहन अपघाताचे सत्र सुरूच आहे. नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद गावाजवळ भीषण अपघात घडला. या अपघातात त 5 जणांचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. भरधाव वेगात असणाऱ्या बोलेरो वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असेल्या 3 दुचाकींना चिरडले. ऐन दिवाळीत कुटुंबावर शोककळा पसरली. 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातात चार चाकी वाहनांसह मोटरसायकलींचा जागीच चुरडा झाला.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर लोय पिंपळोद गावाजवळ हा अपघात घडला. एक मोटारसायकल नादुरुस्त होती. अंधार असल्याने दुचाकी दुरूस्तीसाठी इतर दोन दुचाकी घटनास्थळी आल्या होत्या. त्यावेळी नंदुरबारकडून धानोराकडे एक बोलेरो भरधाव वेगात जात होती. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या तीन दुचाकीला चिरडले. त्यात 5 जणांचा मृत्यू झाला.

या अपघातात योगेश कालूसिंग नाईक, राहुल धर्मेंद्र वळवी, अनिल सोन्या मोरे, चेतन सुनील नाईक, श्रीकृष्ण लालसिंग ठाकरे यांचा मृत्यू झाला. तीन दुचाकींना ठोकरल्यानंतर बोलेरो गाडीही उलटली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऐन दिवाळीतच या गावावर शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी गर्दी केली. त्यांच्या आक्रोशाने अनेकांची मनं हेलावली.

हे सुद्धा वाचा

दोन खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक, अपघातात 1 जण ठार तर 20 जण जखमी

वाशिमच्या कामरगाव जवळ रात्री दोन वाजताच्या सुमारास दोन खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. भीषण अपघात झाला असून यामध्ये रॉयल ट्रॅव्हल्सचा चालक श्रीधर कायवाडे हा जागीच ठार तर 20 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. शब्रिज आणि रॉयल ट्रॅव्हल्स मध्ये ही भीषण धडक झाली. दोन्ही ट्रॅव्हल्स मधील जखमींना अमरावती च्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.अपघाता नंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.