Nandurbar | शवविच्छेदन गृह गेल्या दीड वर्षांपासून बंदच, शहादा नगरपालिका रुग्णालयातील प्रकार, शवविच्छेदनासाठी 16 किलोमीटरचा प्रवास
या रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणुक करण्यात आलीयं. मात्र काही सिरीयस पेशंट राहिला तर त्यांना नंदुरबार किंवा म्हसावद येथे पाठवण्यात येते. शवविच्छेदनासाठी देखील नंदुरबार किंवा म्हसावद येथे पाठवण्यात येते. मग या रूग्णालयाचा काय उपयोग असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायंत.
नंदुरबार : शहादा नगरपालिका रुग्णालयाचे शवविच्छेदन गृह (Mortuary) गेल्या दीड वर्षापासून बंद असल्याने शहादामधील रहिवाशांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागतंय. परिसरातील नागरिकांना नैसर्गिक आपत्ती अथवा अपघाती दुर्घटनेत मृत (Dead) झालेल्या व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतोयं. मुर्तदेह शवविच्छेदनासाठी 16 किलोमीटर दूर असलेल्या म्हसावद तालुका शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जावे लागत आहे. शहादा शहराची 64 हजारांपर्यंत लोकसंख्या बघता नगरपालिका रुग्णालयाला (Hospital) शवविच्छेदन गृह आहे. मात्र गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
शहादा येथील शवविच्छेदन गृहाला लावण्यात आले कुलूप
शहादा येथे कोणत्याही प्रकारचे शवविच्छेदन केले जात नाही. शवविच्छेदन गृहाला कुलूप लावण्यात आले असून मोठमोठी काटेरी झुडपे तेथे वाढली आहेत. शहादा शहरातील कोणत्याही व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास शवविच्छेदन करण्यासाठी 16 किलोमीटर अंतरावर म्हसावद तालुका शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात जावे लागते. नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड लागतोयं. शिवाय वेळही अधिक जातो काही वेळा दोन-तीन दिवस प्रेत पडून राहते प्रेतांची हेळसांड होते. अनेक वेळा मोठे वाद झाले आहेत. मात्र अद्याप अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही.
शवविच्छेदनासाठी करावा लागतोयं 16 किलोमीटर दूरचा प्रवास
या रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणुक करण्यात आलीयं. मात्र काही सिरीयस पेशंट राहिला तर त्यांना नंदुरबार किंवा म्हसावद येथे पाठवण्यात येते. शवविच्छेदनासाठी देखील नंदुरबार किंवा म्हसावद येथे पाठवण्यात येते. मग या रूग्णालयाचा काय उपयोग असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायंत. मरणानंतर मोक्ष प्राप्त होत असतो असे म्हटले जाते. मात्र उलट स्थिती या ठिकाणी पाहण्यास मिळते. मरनानंतर मोक्षापेक्षा शवविच्छेदनासाठी अधिक मरणयातना सहन कराव्या लागत आहे हे सत्य आहे. विकासाच्या गप्पा करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना ही याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.