Nandurbar ZP Election: नंदुरबारमध्ये काँग्रेसचे मंत्री के. सी. पाडवी, भाजपच्या हिना गावित, सेनेच्या चंद्रकांत रघुवंशींची प्रतिष्ठा पणाला, कोण बाजी मारणार?

Nandurbar Zilla Parishad and Panchayat Samiti Election Results 2021 Counting and LIVE Updates: नंदुरबार जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजप, काँग्रेस,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं ताकद लावली होती. सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांनी त्यांच्या नातेवाईंकांना उमेदवारी दिल्यानं निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.

Nandurbar ZP Election: नंदुरबारमध्ये काँग्रेसचे मंत्री के. सी. पाडवी, भाजपच्या हिना गावित, सेनेच्या चंद्रकांत रघुवंशींची प्रतिष्ठा पणाला, कोण बाजी मारणार?
ZP And Panchayat Samiti Election Result
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 8:50 AM

नंदुरबार: ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील रिक्त झालेल्या 11 जिल्हा परिषद सदस्य आणि 14 पंचायत समिती सदस्यांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये कुठे ही प्रचारात ओबीसी आरक्षणाचा मुदा प्रभावी दिसला नाही.स्थानिक मुद्यावर ही निवडणुकीचा प्रचार झाला. जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या विशेषत काँग्रेस, भाजप, शिवसेना नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी आपली ताकद पणाला लावलेली दिसून आली.

राजकीय नेत्यांचे कुटुंबीय मैदानात

भाजप नेते डॉ.विजयकुमार गावित यांची कन्या तर खासदार डॉ. हिना गावित यांच्या लहान बहीण डॉ. सुप्रिया गावित यांना कोडदा गटातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्या सोबत डॉ. विजयकुमार गावित यांचे पुतण्या पंकज गावित यांना कोपरली गटातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांची बहिणीला खापर गटातून काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यासबत शिवसेना नेते आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी याचा मुलगा राम रघुवंशी यांना कोपर्ली गटातून शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. यांच्या लढतीकडं नंदुरबारचं लक्ष लागलं आहे.

सर्व जागांवर विजयी होणार, भाजपचा दावा

ओबीसी आरक्षण घोळामुळं नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 11 जागा रिक्त झाल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या 11 आणि पंचायत समितीच्या 14 गणांमध्ये निवडणूक पार पडली आहे. ओबीसी भाजपाचे 11 पैकी सात सदस्य अपात्र ठरल्याने त्यामुळे भाजपाला नुकसान सहन करावा लागला होता. मात्र, या पोटनिवडणुकीमध्ये भाजपकडून 11 जागांवर 11 उमेदवार दिले असून आता सर्वाधिक जागा भाजपाच्या निवडून येतील असा विश्वास खासदार डॉ. हिना गावित यांनी केला आहे.

5 जागांवर विजय मिळवू, सेनेला विश्वास

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होत झालं आहे.पोटनिवडणुकीत शिवसेनेचे 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यापैकी 5 उमेदवार विजयी होणार आहेत, असा विश्वास सेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषदेत या निवडणुकीनंतर सत्तांतर होऊन कुठल्याही प्रकारचा महविकास आघाडी ला बसणार नाही भाजपाचे सत्तेचे स्वप्न कधी साकार होणार नाही असा टोला त्यांनी लगावला.

सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला

नंदुरबार जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजप, काँग्रेस,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं ताकद लावली होती. सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांनी त्यांच्या नातेवाईंकांना उमेदवारी दिल्यानं निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.

महत्त्वाच्या लढती

कोळदा, खापर आणि कोपार्ली जिल्हा परिषद गटात महत्वाच्या लढती होत आहेत. माजी मंत्री विजयकुमार गावितांची मुलगी मैदानात सुप्रिया गावित असून त्यांच्या विरोधात शिवसेनेचे समीर पवार निवडणूक लढवत आहेत. भाजपा विरुद्ध शिवसेना असा थेट सामना या गटात सामना होत आहे. खापर गटात गीता कागडा विरुद्ध भाजपचे माजी मंत्री यांचा मुलगा नागेश पाडवी या लढतीकडे देखील लक्ष लागलं आहे. खापर गटात भाजपा विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होत आहे. तर, कोपार्ली गटात शिवसेना नेते चंद्रकांत रघूवंशी यांचा मुलगा राम रघूवंशी शिवसेना विरुद्ध भाजपचे पंकज गावित यांच्यात शिवसेना विरुद्ध भाजपा असा थेट सामना होत आहे.

ओबीसी आरक्षण रद्द होण्यापूर्वीचं जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल

काँग्रेस : 23 भाजपा : 23 शिवसेना : 7 राष्ट्रवादी : 3

इतर बातम्या:

Dhule ZP by Election : भाजपला बहुमतासाठी 2 जागांची गरज, महाविकास आघाडीचं तगडं आव्हान

Maharashtra ZP and Panchayat Samiti Election Results 2021 LIVE: जिल्हा परिषद-पंचायत समितीचा निकाल, गुलाल कुणाचा?, राज्याचं लक्ष!

Nandurbar ZP and Panchayat Samiti Election Results 2021 counting live Updates BJP and Congress who will came in power

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.