यांचं वक्तव्य म्हणजे बेताल आणि मुक्ताफळ उधळणारी, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुनावलं
संजय राऊत यांनी भविष्यकाळात विधान करताना विचारपूर्वक करावं, असा सल्लाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
अहमदनगर : महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर येथे बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, संजय राऊत यांच्या विधानाला किती महत्त्व देणार हाच खरा प्रश्न आहे. बेताल आणि मुक्तफळ उधळणारी वक्तव्य राऊत करत आले आहेत. त्याला दुर्लक्षित केलं पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटील हे संजय राऊत यांनी एसआयटी चौकशीबाबत केलेल्या वक्तव्यावर म्हणाले, संजय राऊत मधल्या काळात हवा पलट करून आले आहेत. तेव्हा त्यांनी बऱ्यापैकी चिंतन केलेला दिसतोय. मात्र त्याचा फार उपयोग त्यांना होताना दिसत नाहीय. त्यामुळे संजय राऊत यांनी भविष्यकाळात विधान करताना विचारपूर्वक करावं, असा सल्लाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
पशुवैद्यकीय महाविद्यालयावरून एकनाथ खडसे यांना राधाकृष्ण विखे पाटलांनी टोला लगावला. पन्नास वर्षाच्या काळात एकनाथ खडसेदेखील मंत्री होते, त्यांचीदेखील जबाबदारी होती. राज्यात सहा पशुवैद्यकीय महाविद्यालय आहेत. तर विद्यापीठाच्या ऍक्टमध्ये आपण बदल करत आहोत.
शासकीय महाविद्यालय सुरू झाले पाहिजे तर विनाअनुदानित कोणी मागत असेल तर त्यालासुद्धा परवानगी दिली जाईल, हे सरकारचे धोरण आहे.
खोकेवाल्या आमदारांची एसआयटी चौकशी करायला हवी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. कोणत्याही विषयावर एसआयची लावायची सरकारला सवयचं लागली आहे. संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला.
एसआयटी एखाद्या राज्यात कधीही स्थापन झाल्या नव्हत्या. राज्यात सर्वात आधी एसआयटी स्थापन व्हायला पाहिजे. सरकार फोडताना ५०-५० खोकी घेऊन फोडण्यात आले त्यावेळी काय व्यवहार होता, त्यावर. या सरकारला एसआयटी स्थापन करायची खुप खाज आहे, खाजवत बसा, अशा निशाणाही साधला.
एसआयटी ही अत्यंत महत्त्वाच्या विषयावर स्थापन केली जाते. पण, या सरकारनं एसआयटी आणि पोलिसांचं महत्त्व कमी केल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला होता.